अर्णब गोस्वामी यांची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांची फी माहितीये का?

0

 

अर्णब गोस्वामी यांची बाजू मांडणारे प्रसिद्ध मराठी वकील हरीश साळवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. साळवे यांची भारतातील अतिशय उच्चभ्रू वकील म्हणून ओळख आहे. त्यांचे राहणीमान जसे आहे त्याचप्रमाणे त्यांची फी देखील तेवढीच आहे. साळवे यांची फी ऐकून अनेक लोक तोंडात बोटं घालतात.

हरीश साळवे यांचे मुळगाव नागपूर आहे. त्यांचे वडील हे दिवंगत काँग्रेस नेते होते मात्र हरीश यांना राजकारणात रस नव्हता. त्यांनी सीएचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते वकिलीत आले. वडील राजकारणी असल्याने त्यांना या क्षेत्रात मोठा फायदा झाला.

तेव्हा साळवे यांची ओळख जेष्ठ वकील नानी पालखीवाला यांच्याशी झाली. हरीश यांच्या वकिलीच्या कारकिर्दीला सुरुवात १९७५ ला झाली. त्यांचा पहिलाच खटला दिलीप कुमार यांचा होता. तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांनी बाजू कोर्टात मांडली होती.

१९९२ मध्ये हरीश साळवे यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. पूढे त्यांनी टाटा, महिंद्रा, अंबानी यांच्या सारख्या मोठ्या घराण्यांची वकिली केली. केजी बेसिन प्रकरणात मुकेश अंबानी यांची बाजू हरीश साळवे यांनीच मांडली होती. मात्र त्यांना खरी ओळख व्होडाफोन खटल्यामुळे मिळाली.

व्होडाफोनने १४२०० कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा प्रकरण गाजत होते. तेव्हा हरीश साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडत त्यांना विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून हरीश साळवे यांना एक वेगळी ओळख मिळाली होती.

कधी सलमान खानची वकिली केली म्हणून त्यांच्यावर टीका झाली आहे, तर कधी कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढण्यासाठी फक्त एक रुपया घेतला म्हणून पूर्ण देशाने त्यांचे कौतुकही केले आहे.

हरीश साळवे हे एक खटला लढण्यासाठी जवळपास ४.५ लाख रुपये घेतात. तसेच त्यांना कायद्याविषयीची पुस्तके वाचायला आवडतात. त्यांना सानिया आणि साक्षी अशा दोन मुली आहेत. त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि पियानो वाजवणे असे त्यांचे छंद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.