नाद खुळा! सरकारी नोकरी सोडून सुरु केली ही शेती आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये

0

 

अनेकदा माणूस नोकरी करत असतो पण त्याला नोकरी हवा तेवढा पैसा मिळत नाही म्हणून तो स्वता:चा व्यवासाय सुरु करतो. आता गुजरातच्या एका माणसाने असेच काहीसे केले आहे. त्याने नोकरी सोडून शेती सुरु केली आणि ती शेती करुन तो आता लाखोंची कमाई करत आहे.

गुजरातच्या सुरतमध्ये राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव लवजी असे आहे. ते गुजरात परिवहन मंडळात एसटी बसमध्ये कंडक्टर म्हणून कामाला होते. तिथे त्यांना पगार कमी होता त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना अनेक अडचणी यायच्या. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून स्वता:चे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.

लवजी गावी परतले आणि त्यांनी टेक्सटाईल्सचा व्यवसाय सुरु केला. त्यांना या व्यवसायात चांगला नफा मिळत होता पण गुजरातमध्ये महापुर आला होता. महापुराचे पाणी त्यांच्या दुकानात घुसल्याने कपड्यांचे आणि मशिनरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

त्यांची स्थिती इतकी बिघडली होती की त्यांना मक्याचे कणीस खावे लागत होते, तिथूनच त्यांना शेती करण्याची आयडिया आली आणि त्यांनी मक्याची शेती करण्याचे ठरवले.

त्यामुळे त्यांनी आपल्या शेतीत मक्याची झाडे लावली, पण त्यात त्यांना तीन वर्षे झाले तरी त्यांना यश मिळाले नाही म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी मक्याच्या वेगवेगळ्या प्रजाती शोधल्या.

तेव्हा त्यांना असे कळाले की बाजारात अमेरिकन कॉर्नची मोठ्या प्रमाणात मागणी होती, पण तेव्हा तिथे या प्रकारच्या मक्याची शेती करण्याचे प्रमाण जास्त नव्हते. त्यामुळे लवजी यांनी याच मक्याची शेती करण्याचा निर्णय घेतला.

त्यांचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे. ते शेतातून हा मका तोडून आणतात आणि विकतात. त्यांच्या राजकोटमध्ये दोन दुकान आहे. अमेरिकनसोबतच त्यांनी आता वेगवेगळे कॉर्न विकण्यास सुरुवात केली आहे. ही शेती करुन आता ते लाखोंची कमाई करताना दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.