लातुरच्या १४ वर्षीय सृष्टीच्या लावणीवर लोकं घायाळ; सलग २४ तास लावणीवर नाचत केला विक्रम

0

 

लातूरच्या सृष्टी जगताप हिने सलग २४ तास लावणी नृत्य करण्याचा विक्रम केला आहे. तिच्या या विक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या निरीक्षकांनी ही नोंद केली आहे.

२६ जानेवारीला लातूरमधल्या दयानंद सभागृहात संध्याकाळी ४:३० च्या सुमारास तिने पावणी करण्यास सुरुवात केली होती. तिने लावणी नृत्य सलग २४ तास म्हणजे २७ जानेवारीच्या संध्याकाळी ४:३० पर्यंत सादर केले आहे.

लातूरमध्ये राहणारी सृष्टी सध्या नववीत शिकत आहे. ती लातूरच्या पोद्दार स्कुलमध्ये शिकते. सृष्टीने लावणी सादर करताना प्रत्येक तासाला तीन मिनिटे ब्रेक घ्यायची. तसेच तिला सलग नृत्य करताना काही त्रास त होत नाहीये ना याकडे लक्ष दिले जायचे.

दर दोनतासांनी तिला डॉक्टर विचारपूस करायचे. मात्र न थकता न जास्तवेळ थांबता सृष्टीने हा लावणी नृत्य करण्याचा निर्णय घेतला होता आणि तिने तो पूर्णही करून दाखवला.

सृष्टीचे २४ तास लावणी नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलग २४ तास लावणी नृत्य करण्यासाठी सृष्टीने चारवेळा सराव केला होता विशेष.

सृष्टीने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच आतपर्यंत विविध कार्यक्रमांमधून तिने ७१ पारितोषिक पटकावली आहे. यापूर्वी तिने सलग १२ तास नृत्य सादर केले होते.

सृष्टीचे आईवडील दोघेही जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षक आहे. सृष्टीने केलेल्या विक्रमामुळे लातूर जिल्ह्यात सगळीकडेच तिचे कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.