लालुप्रसाद यादवांमुळे २००४ साली मनमोहनसिंग झाले होते पंतप्रधान; वाचा पुर्ण किस्सा

0

 

लालू यादव यांची राजकारणात एक वेगळीच ओळख आहे. लालू प्रसाद यादव यांनी राजकारणात अनेक लोकांना धूळ चारली आहे. तितकाच दबदबा त्यांचा राजकारणातही होता, असाच एक किस्सा त्यांच्या आत्मकथेत लिहला आहे.

वर्ष २००४ पासून २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग होते. मात्र मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवण्यात लालू यादव यांचा हात होता. लालू यादव यांच्या मंजुरीनंतर सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले होते, याबाबत लालू प्रसाद यांची आत्मकथा ‘गोपालगंज से रायसीना’ यात लिहलेले आहे.

तेव्हा झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर लालू यादव यांचे 22 खासदार निवडून आले होते. तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होणार होत्या त्यावर लालू यादव देखील खुश होते. तसेच लालू यादव यांना सोनिया सोडून पंतप्रधान पदी कोणी दुसरे नको होते.

मात्र सोनिया गांधी यांच्या डोक्यात वेगळाच विचार होता. त्यांना डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधान बनवायचे होते. त्यासाठी सोनिया गांधी लालू यांना विचारणा केली. मात्र त्यांना मनमोहनसिंग हे पंतप्रधान म्हणून मान्य नव्हते.

त्यानंतर सोनिया गांधी डॉ मनमोहन सिंग यांच्यासोबत लालू यादव यांच्या घरी गेल्या. तसेच लालू यादव यांना कारण विचारले की, त्यांना डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून का नको आहे. तसेच पूढे सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना लालू यादव यांना आग्रह करण्यास सांगितला. तेव्हा मनमोहन सिंग यांनी लालू यादव यांना आग्रह केला होता.

लालू यादव यांना सोनिया गांधींना पंतप्रधान होताना बघायचे होते, मात्र मनमोहन सिंग यांनी केलेल्या आग्रहापुढे लालू यादव नरम पडले. त्यांनी आग्रह स्वीकार केला आणि त्यांनी डॉ मनमोहन सिंग यांना पंतप्रधान होण्यास मंजुरी दिली.

अशा प्रकारे लालू यादव यांच्या सहमतीने डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान झाले. लालू यादव यांच्याकडे तेव्हा २२ खासदार होते, तेव्हा जर त्यांनी काँग्रेससोबत असलेले समर्थन बाजूला केले असते, तर तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग नसते.

Leave A Reply

Your email address will not be published.