गुऱ्हाळ्याचे काम आनंदाने करणाऱ्या कांचनताई, महाराष्ट्रातील पहिल्या ‘महिला गुळव्या’

0

आज आम्ही तुम्हाला आशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या गुऱ्हाळघरात महिला गुळव्या म्हणून समर्थपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन खूप मोठा पल्ला गाठला आहे.

त्यांच्या या कामामुळे त्यांनी एक दुर्मिळ ओळख निर्माण केली आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या पतीनेही साथ दिली. उसाचा रस काहिलीत टाकला की लगेच त्यांचं काम सुरू होतं. रसातील मळी काढण्यापासून ते चुलवणाच्या ज्वालांकडे त्यांची सारखी नजर असते.

उकळणाऱ्या उसाच्या उसाबरोबर काहिलीत रंग बदलणाऱ्या रसावरही त्यांची नजर असते. तोंडावर त्याच्या गरम वाफा येत असतात. त्याचीही कसलीही पर्वा त्यांना नसते. हातातील फावड्याची जलद हालचाल करत काहिलीत रसाला गती देण्याचे काम करत असताना त्यांचे सगळीकडे लक्ष असते.

मग गूळ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. जाळ बंद करा असा आदेश दिला जातो. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रस गूळ करण्यासाठी मधल्या साच्यात ओतला जातो. इतका वेळ असलेला कामाचा दबाव काही वेळाने कमी होतो आणि गोड गूळ तयार होतो.

ही प्रक्रिया खूप अवघड असते. हे खूप कौशल्याचे नाव असते. यात काहीही चूक झाली तर गुळाचा दर्जा बिघडतो. शक्यतो महिला हे काम करत नाहीत. गुऱ्हाळ्यात हे काम शक्यतो पुरुषच करतात. पण हे काम कांचनताई मोठ्या आनंदाने करतात.

पण त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा त्यांच्या मुलाचा हात इंजिनच्या बेल्टला लागला. त्यांच्या मुलाला हात गमवावा लागला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही तरीही त्यांनी गुळव्याच काम चालूच ठेवले.

मुलानेही खंबीर होऊन एका हातावर कंटेनरच्या ड्रायव्हिंगला सुरुवात केली. आज मुलगा आणि कांचनताई मिळून मोठ्या उत्साहाने त्यांचे काम पार पाडत आहेत. सकाळी सातपासून संध्याकाळी सातपर्यंत गुऱ्हाळ चालूच असते.

कांचनताई यांना एका काहीलीमागे १४ रुपये मजुरी मिळते. पती गुऱ्हाळ्यात अन्य कामे करत असतात. कांचनताई दिवसभर खूप व्यस्त असतात. जेवण व नाश्त्याची वेळ सोडली तर त्या दिवसभर काम करत असतात. त्यांच्या या कार्याला एक सलाम तर बनतोच.

Leave A Reply

Your email address will not be published.