आत्मनिर्भर महिला! या महिलांनी झेंडू फुलवून केली लाखोंची कमाई

0

धारबांदोड्यातील महिलांनी आत्मनिर्भर बनत झेंडूच्या लागवडीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. दूध आणि भाजीपाला यातुन राज्य स्वयंपूर्ण बनावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे.

धारबांदोड्यातील महिलांनी महिलांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. या लागवडीतून त्यांनी एक नवा आदर्श उभा केला आहे. राज्यात झेंडूच्या शेतीला खूप वाव आहे. काजू, सुपारीप्रमाणे झेंडूच्या फुलांनादेखील खूप मागणी आहे.

गोव्यात फुलांना मोठी मागणी आहे पण गोव्यात कोणीही जास्त फुलांची शेती करत नाही. घरामध्ये किंवा बागेमध्ये अनेक लोक फुले लावतात पण उत्पन्नाच्या दृष्टीने कोणीही फुलांकडे पाहत नाही. फुलविक्रेते फुले विकत घेतात किंवा माळा करून विकतात.

सणासाठी गरज भागविण्यासाठी बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात फुले मागवली जातात. स्वयंसहाय्य गटाच्या महिलांनी कृषी खात्याच्या मदतीने झेंडूच्या फुलांचे बगीचे फुलवून भरीव कमाई केली आहे.

त्यांनी दसऱ्याला ६ ते ७ हजार किलो फुले विकली आहेत. सरासरी ८० ते १०० रुपये किलो दराने त्यांनी ही फुले विकली आहेत. दिवाळीलाही त्यांनी फुले विकून भरगोस कमाई केली आहे. अशी माहिती अधिकारी नागेश कोमरपंत यांनी दिली आहे.

या महिलांना आत्मा या कृषी खात्याच्या योजनेअंतर्गत १ हजार रोपे देण्यात आली होती. त्यांना लागवड कशी करायची?, त्यांची निगा कशी राखावी? याची माहिती देण्यात आली होती. पण जशी त्यांची रोपे बहरली तशी बाकीच्या तालुक्यातील रोपे बहरली नाहीत.

स्वयंसहाय्य गटातील बऱ्याच महिला आधी पारंपरिक पद्धतीने रोपे लावत होत्या. यंदाच्या वेळी कृषी खात्याने सांगलीजवळ प्रविराम नर्सरीतून रोपे आणून त्यांना दिली होती. त्यांना ही मोफत मदत करण्यात आली होती. शेती, बागायतीप्रमाणे फुलांच्या शेतीलाही मोठी मागणी आहे हे या गटाच्या महिलांनी दाखवून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.