जेव्हा कुशल बद्रिकेकडे ५० रुपये पण खर्चायला नव्हते, तेव्हा एक मुलगी त्याच्या बॅगेत पैसे ठेऊन पळुन जायची

0

‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेमधल्या प्रत्येक कलाकाराने आपली फक्त महाराष्ट्रातच नाही तर पुर्ण देशभरात एक वेगळी निर्माण केली आहे. तसेच सर्व कलाकार तळागाळातुन आलेले आहे, हे सर्वांना माहित आहेत. अशात मालिकेतला कलाकार कुशल बद्रिकेची लव्हस्टोरी समोर आली आहे.

कुशल बद्रिकेने स्वता: ची लव्हस्टोरी सांगितली आहे. कुशल बद्रिकेची लव्ह स्टोरी वाटते तितकी सोपी नव्हती. गरिबीत पण प्रेम जिवंत ठेवणाऱ्या व्यक्ती असतात, प्रेमात श्रीमंत गरीब असे काहीच नसते, असे या लव्हस्टोरीतुन दिसून येते.

कुशल बद्रिकेची परिस्थिती आधी खुप गरिबीची होती. अशात जेव्हा त्याचे वडिल रुग्णालयात उपचार घेत होते, तेव्हा तर त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली होती.

कुशल बद्रिके तेव्हा नाटकाचे प्रयोग करायचे, पण जेव्हा नाटकाचे प्रयोग सुरु व्हायचे तेव्हा त्यांच्या मनातली धाकधुक आणखी वाढायची. कारण नाटकाच्या प्रयोगाचे पैसे वेळेवर मिळायचे नाही.

जेव्हा माझ्याकडे पैसे नसायचे, त्यामुळे मला प्रवास करता यायचा नाही. अनेकदा पैसे नसल्यामुळे काही खाता पण यायचे नाही. पण तेव्हा कुणीतरी मुलगी माझ्या बॅगेत ५०-६० रुपये गुपचुप टाकायची.

त्या पैशांमुळे मला वडापाव खाता यायचा त्यामुळे माझे पोट भरायचे, तसेच बस भाड्याचे काम होत असल्याने मला प्रवास करता यायचा. ती मुलगी माझी प्रेयसी होती. आता ती समोर असुन मला तिला थँक्स म्हणायचे आहे, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे. आज तीच मुलगी कुशल बद्रिकेची आज पत्नी आहे.

कुशल बद्रिकेच्या पत्नीचे नाव सुनैना असे आहे. सुनैना देखील कला क्षेत्रातीलच आहे. कठिण प्रसंगात सुनैनाने कुशल बद्रिकेला दिलेली साथ हि खरंच कौतुकास्पद आहे.

आज कुशल बद्रिके त्याच्या अभिनयामुळे आणि चला हवा येऊ द्या या शोमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचला आहे. तसेच तो नेहमीच प्रत्येकाला हसवताना आपल्याला दिसून येतो असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.