एका पायाने अधू असून तीन किलोमीटर धावला, ५३ वर्षाच्या माणसाने वाचवले हजारोंचे जीव

0

 

 

आपण अशा अनेक घटना बघतो जिथे लोक स्वता:चा विचार करण्यापेक्षा दुसऱ्या लोकांचा विचार करताना दिसतात. अनेकदा तर लोक दुसऱ्यांचा जीवही वाचवतात. अशीच एक घटना पुन्हा आता समोर आली आहे.

कर्नाटकच्या उडुपीमध्ये राहणाऱ्या एका अपंग माणसाच्या सतर्कतेमुळे एक मोठा रेल्वे अपघात टाळला आहे. या माणसाचे नाव कृष्णा पुजारी असून ते ५३ वर्षाचे आहे.

पुजारी यांना एक आजार झालेला आहे, त्यामुळे त्यांचा एक पाय अधू झालेला आहे. ज्यामुळे त्यांना चालता येत नाही. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतले असता, डॉक्टरांनी त्यांनी सकाळी फेरफटका मारण्याचा सल्ला दिला होता.

शनिवारी जेव्हा कृष्णा सकाळी फिरायला गेले तेव्हा त्यांनी पाहिले की ब्रम्हानाथा येथे रेल्वेची पटरी तुटलेली आहे. तेव्हा कृष्णा विचारच करत होते की तितक्यात त्या पटरीवरुन एक रेल्वे गेली आणि ती पटरी आणखी तुटली.

कृष्णा यांनी कुठलाही विचार न करता रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. एका पायाने त्यांना चालता येत नसतानाही मोठा अपघात टाळण्यासाठी ते तीन किलोमीटर धावले आणि रेल्वे स्टेशनवर पोहचले. तिथे रेल्वे कर्मचाऱ्यांना याबाबत त्यांनी सांगितले.

कृष्णा यांनी सांगितल्यानंतर लगेचच रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. अशाप्रकारे कृष्णा यांनी एक मोठा रेल्वे अपघात आपल्या सतर्कतेमुळे टाळला आहे. काही वेळानंतर त्या ट्रॅकवरुन दोन रेल्वे जाणार होत्या, पण त्या थांबवण्यात आल्या.

जेव्हा मी पाहिले की पटरी तुटली आहे, तेव्हा मी लगेच रेल्वे स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी पाय खुप दुखत होता, पण जर मी अधिकाऱ्यांना माहिती दिली नसती, तर जिवीतहानी झाली असती, त्यामुळे मी विचार न करता रेल्वे स्टेशनच्या दिशेने धाव घेतली, असे कृष्णा यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.