दत्तक घेतलेल्या मुलींचा सांभाळ करण्यासाठी चक्क पतीलाही सोडले; वाचा कोण आहे ‘ही’ महिला

0

 

सध्या सोशल मिडीयावर एका महिला डॉक्टरचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. यात एका महिला डॉक्टरच्या हातात दोन जुळ्या मुली दिसत आहे. खरंतर या डॉक्टरने दोन जुळ्या मुलींना दत्तक घेतलेले आहे. तेव्हा त्यांचे लग्नही झालेले नव्हते. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ती स्टोरी…

एका डिलिव्हरी झालेल्या महिलेने आपल्या जुळ्या मुलींना जवळ घेण्यापासून नाकारले होते, त्यामुळे त्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉ. कोमल यादव यांनीच त्या जुळ्या मुलींना दत्तक घेतले आहे.

जेव्हा त्यांनी दत्तक घेतले तेव्हा त्या अविवाहीत होत्या, त्यानंतर त्यांचे लग्न झाले पण मुलींना चांगले शिक्षण मिळावे आणि चांगले संस्कार मिळावे यासाठी तिने तिच्या पतीलाही सोडले आहे.

सध्या कोमल चंदीगडमध्ये नोकरी करत आहे. त्या मूळच्या बुलंदशहरातल्या आहे. या मुलींना सांभाळण्यासाठी कोमल यांच्या आईसुद्धा त्यांना साथ देत आहे.

२०१४ मध्ये कोमलने महाराष्ट्रातून एमएसचे शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर तिने फर्रुखाबादच्या मेडीकल कॉलेजमध्ये काम सुरु केले. त्यावेळी तिने एका महिलेची डिलिव्हरी केली होती.

ज्या महिलेची डिलिव्हरी झाली तिच्या पतीचे काही महिन्यांपुर्वीच निधन झाले होते. तसेच तिची आर्थिक परिस्थिती खराब होती. त्यामुळे त्या जूळ्या मुलींना त्या महिलेने स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर कोमल यादवने त्या मुलींना दत्तक घेतले.

२०१६ मध्ये जेव्हा तिचे लग्न झाले, तेव्हा तिने आपल्यासोबत त्या मुलींनाही तिथे नेले. तिने मुलींना प्रेम मिळाले पण कोमलच्या आणि तिच्या नवऱ्यामधले मतभेद वाढले. पुढे त्यांनी एकमेकांना सोडण्याचा निर्णय घेतला.

कोमल गेल्या तीन वर्षांपासून चंदीगडमध्ये राहत आहे. तिचे स्व:ताचे क्लिनिक असून दोन खाजगी हॉस्पिटलमध्ये ती नोकरी करत आहे. त्या दोन मुलींचे नाव रीत आणि रिदम असे आहे. त्या आता पाच वर्षांच्या झाल्या असून चंदीगडच्या मानव मंगल स्कूलमध्ये शिकत आहे.

मुलींनी मला जगायला शिकवले आहे. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना चांगले शिक्षण देणे, चांगले संस्कार देणे हीच माझी इच्छा आहे, असे कोमलने म्हटले. दोन अनोळख्या मुलींची जबाबदारी घेतल्याने अनेकांसाठी कोमल प्रेरणादायी ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.