कोल्हापूरच्या इंजिनिअर तरुणांचा भन्नाट प्रयोग; आता चहा पिल्यानंतर कप येईल खाता

0

 

 

 

आजकाल आपण जर बाहेर चहा कॉफी पिण्यासाठी गेलो, तर बऱ्याचदा आपल्याला प्लास्टिकच्या कपात चहा, कॉफी दिली जाते. कोरोनामुळे तर प्लास्टिकच्या वापरात प्रचंड वाढली आहे.

प्लास्टिकच्या वापराचे हे वाढते प्रमाण पर्यावरणासाठी घातक ठरत आहे, त्यामुळे अनेक लोक यावर उपाय शोधत आहे. अशात कोल्हापुरच्या तीन तरुणांनी प्लास्टीकचा वापर कमी व्हावा, यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे.

या तरुणांनी चहा, कॉफीसाठी प्लास्टीक कपला पर्याय म्हणून बिस्किट कप तयार केला आहे. हा कप तयार करणाऱ्या कोल्हापुरातील या तीन सुशिक्षित तरुणांचे नाव दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर असे आहे.

या तिघाही तरुणांचे इंजिनियरिंगचे शिक्षण झाले आहे. शिक्षण झाल्यानंतर सामाजहिताचे काही काम करता येईल यावर त्यांचे लक्ष होते. त्यांना समाजासाठी काहीतरी वेगळे करयचे होते त्यातुनच त्यांना बिस्किट कपाची कल्पना सुचली.

प्लास्टिक कप पर्यावरणाला हानिकारक आहे, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून बिस्किट कप त्यांनी तयार केला. विशेष म्हणजे तरुणांनी तयार केलेले हे बिस्किट कप खाण्यायोग्य आहे.

मॅग्नेट एडिबल कटलरी या ब्रँडमार्फत तरुणांनी हे बिस्किट कप उपलब्ध करुन दिले आहे. हे कप मैद्यापासून तयार करण्यात आले आहे, या कपात चहा, कॉफी घेतल्यानंतर आपण हे खाऊ शकतो. तसेच हे कप आपण जर फेकून दिले तर भटकी जनावरे ही या कपाला खाऊ शकतात.

या तरुणांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतल्याने हे कप तयार करण्याची मशीन त्यांनी स्वता: डिझाईन करुन कोल्हापुरातच बनवली आहे. तसेच खाण्यायोग्य प्लेट्स, बाऊल्स इत्यादी प्रॉडक्ट्स बनवण्याचे कामही त्यांनी सुरु केले आहे. पर्यावरणपुरकला पुरक असणाऱ्या या कपचा वापर आपण सर्वांनीच केला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.