नोकरी सोडून किराणा दुकाने चालवले, आता महिन्याला करतोय करोडोंची कमाई

0

 

 

माणसात जर आपले ध्येय गाठण्याची जिद्द असेल, तर तो एक दिवशी नक्कीच यशस्वी होऊ शकतो. याचेच उत्तम उदाहरण आहे वैभव अग्रवाल.

आपल्या व्यवसायाची सुरुवात छोट्या किराणा दुकानापासून सुरु करणाऱ्या वैभव आता कोट्यवधींचा मालक बनला आहे. आपल्या वडिलांच्याच किराणा दुकानात बदल करत त्याने स्टार्टअप केले होते.

आतापर्यंत त्याने स्वता: सोबतच १०० दुकामदारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केली आहे. त्याने आपल्या कंपनीचे नाव द किराना स्टोर कंपनी असे ठेवले आहे.या व्यवसायातून गेल्या दोन वर्षात तब्बल ५ कोटींची कमाई केली आहे.

वैभव अग्रवाल उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये राहतो. त्याच्या वडिलांचे एक किराणा दुकान होते. २०१३ मध्ये त्याचे इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण झाले त्यानंतर त्याने काही काळ आपल्या वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत केली.

पुढे एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळे करण्याचा विचार सुरु होता. मैसुरमध्ये नोकरी करत असताना त्याच्या असे लक्षात आले की, तिथली सर्व दुकाने स्मार्ट आहे.

निरीक्षणात त्याचे असे लक्षात आले की तिथली वस्तुंची विक्री आणि तिथली चेन सिस्टिम वेगळी आहे. त्यावेळी त्याने आपल्या वडिलांच्याच किराणा दुकानात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला अनुभवाची गरज होती.

त्यामुळे त्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून एका रिटेल कंपनीमध्ये १० हजार रुपयांच्या पगारावर नोकरी सुरु केली. त्या कंपनीत त्याला रिटेल मार्केटिंग काय असते, ती कशी केली जाते? या सर्व गोष्टींचा अभ्यास केला.

त्यावेळी त्याच्या असे लक्षात आले कि प्रत्येक किलोमीटर प्रॉडक्ट आणि पॅकिंग बदलत आहे. या क्षेत्रातले आपले ज्ञान आणखी कसे वाढवता येईल याकडे त्याने लक्ष दिले. पुढे त्याने एमबीए केले आणि या क्षेत्रातले अनेक बारकावे शिकून घेतले.

त्याने आपल्या वडिलांच्या किराणा दुकानाचे स्वरुप बदलण्यास सुरुवात केली. त्यांना दुकानात वस्तु ठेवण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला. तसेच ज्या वस्तु कमी विकल्या जातात, त्या दुकानात ठेवाच्याच बंद केल्या. तसेच त्याने ग्राहकांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.

त्याच्या भन्नाट कल्पनेमुळे त्यांना चांगलाच नफा झाला. हि गोष्ट लोकांना समजल्यावर एका व्यक्तीने सेम असेच दुकान बनवण्याची इच्छा वैभव समोर व्यक्त केली, तिथूनच त्याने स्टार्टअपला सुरुवात केली.

वैभवने आतापर्यंत १०० दुकानांचे स्वरुप बदलले आहे. तसेच तो फक्त दुकानांचे स्वरुपच नाही बदलत तर तो नवीन दुकान सुरु करण्यास देखील लोकांची मदत करत आहे.

सहा महिन्यांपासून ते १ वर्षाच्या आत ग्राहकांच्या दुकानांमध्ये बदल करुन देण्याचे काम वैभवची कंपनी करते. त्याच्या या कामामुळे तो वर्षाला करोडो रुपये कमवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.