एका बँडवाल्याच्या मुलाने बनवला लघुपट, त्याला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; वाचा त्याचा संघर्षमय प्रवास

0

 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवांवर आपली छाप टाकणारी शॉर्ट फिल्म ‘खिसा’ला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. आज आपण या शॉर्ट फिल्मचे लेखक कैलास वाघमारे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

कैलास हे पटकथा लेखक, संवाद लेखक सोबतच एक उत्कृष्ट अभिनेते सुद्धा आहे. त्यांना लहानपणापासूनच कला क्षेत्रात आवड होती. कथा-कविता तर त्यांनी लिहिन्यासोबतच त्यांनी साहित्य आणि नाट्यशास्त्रात एमएचे शिक्षण सुद्धा घेतले.

कैलास यांनी सेम सेम बट डिफ्रंट नावाचा शो सुद्धा केला आहे. या शोच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहे.

कैलास यांचे वडील बँड वाजवायचे, तसेच त्यांच्या घरात नेहमीच त्यांना इन्स्ट्रुमेंट भिंतीला लटकावलेले दिसायचे. त्यांचा भाऊ ढोल वाजवायचं. हे पाहून अनेकदा कैलास यांच्या मनात सुद्धा हे वाद्य वाजवायची इच्छा होती.

त्यामुळे एकदा कैलास यांच्या वडिलांनी त्यांना एक डफडं बनवून दिले होते. एकदा ते डफडं गळ्यात अडकवून बाहेर गेले. त्यांना वाटत होते की ते डफडं वाजवतील आणि लोक त्यांचे कौतुक करतील.

कैलास जेव्हा गल्लीत गेले तेव्हा सगळी पोरं त्यांना पाहून हसायला लागली, आणि त्यांच्या जातीवरून त्यांना चिडवायला लागली. हे त्यांच्या खूप मनाला लागले होते, ते रडत रडत घरात गेले आणि ते डफडं काढून फेकले. त्यामुळे त्यांनी पुन्हा कधीच कोणत्या वाद्याला हात नाही लावला.

कैलास यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी चित्रपटांच्या माध्यमातून मांडल्या आहेत, तर त्यांनी तान्हाजी- द अनसंग वॉरियर, भिकारी, हाल्फ तिकीट या चित्रपटात भूमिका बजावल्या आहेत.

आता त्यांनीच लिहलेला ‘खिसा’ या चित्रपटाला आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. राजकीय हेतूने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. पण जात, धर्म हे काहीच माहीत नसलेल्या लहान मुलांवर त्याचा काय परिणाम होतो, हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

खिसा या लघुपटाला आतापर्यंत २१ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. या लघुपटाचे लेखक कैलास वाघमारे आहे, तर या लघुपटाला प्रीतम मोरे यांनी दिग्दर्शित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.