याला म्हणतात बुलेट लव्हर! भावाने लाकडापासून तयार केली रॉयल एनफिल्ड बुलेट, पहा व्हिडीओ

0

अनेकांना वेगवेगळे छंद असतात. त्यातीलच एक छंद आहे गाड्यांचा छंद. मग त्यामध्ये येतात बुलेट लव्हर्स. काही बुलेट लव्हर्सचे स्वप्न असते की आपण बुलेटच घ्यायची. मग तरूणांमध्ये त्याचा इतका क्रेझ असतो की ते त्यासाठी काहीही करायला तयार असतात.

बुलेटवर सवारी करण्याची एक वेगळीच मजा असते. सध्या सोशल मिडीयावर एका बुलेट प्रेमीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या माणसाचे बुलेटवर इतके प्रेम होते की त्याने लाकडापासून बुलेटच तयार केली.

ही बुलेट पाहून भल्या भल्या लोकांचे डोळ्याचे पारने फिटले आहे. कारण ही लाकडाची बुलेट अगदी खऱ्याखुऱ्या बुलेटसारखी दिसते. तशीच रूबाबदार आणि स्टायलिश. ही बुलेट पाहून तुम्ही तिच्या मोहात पडाल.

ज्यांनी ही बुलेट तयार केली आहे ते व्यक्ती इलेक्ट्रिशीयन आहेत. २ वर्षांपुर्वी त्यांनी लाकडापासून बुलेट बनवायला सुरूवात केली होती. आता ही बाईक पुर्णपणे तयार झाली असून तिचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

ANI ने यांसदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही बाईक लाकडापासून बनवली आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. त्यासाठी या कलाकाराने वेगवेगळ्या लाकडांचा वापर केला आहे. बाईक्सचे टायर बनविण्यासाठी त्यांनी मलेशियाई लाकडांचा वापर केला आहे.

तसेच पॅनल्ससाठी रोजवूड लाकडाचा आणि टिकवूड या लाकडांचा वापर केला आहे. त्यांचे नाव जिदहिन आहे. याआधीही त्यांनी लाकडापासून बुलेट तयार केली होती पण ते बुलेटचे लहान मॉडेल होते. आता त्यांनी बुलेटचे मोठे मॉडेल तयार केले आहे.

ही बाईक तयार केल्यानंतर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे त्यांना बुलेट इतकी आवडते की ज्यावेळी त्यांनी बुलेट घेतली होती तेव्हाच त्यांनी ठरवले होते की आपण लाकडापासून नवीन बुलेट तयार करायची.

Leave A Reply

Your email address will not be published.