फुलांच्या व्यवसायातून ही महिला बघा कशी करतेय महिन्याला लाखोंची कमाई…

0

 

शेती करत असताना अनेक लोक शेती सोडून वेगवेगळ्या व्यवसाय करत असतात, आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत ज्या महिलेने शेतात फुलांची नर्सरी सुरु केली आणि आता त्या नर्सरीतून ती महिला महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडाची गावात राहणाऱ्या या महिलेचे नाव कविता लडकत आहे, कविता त्यांच्या शेत जमिनीवर नर्सरीचा व्यवसाय करतात. त्यांचे पती धनंजय पुण्याला नोकरी करत असताना कविता यांना नर्सरीसाठी मार्गदर्शन करतात.

कविता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर त्यांनी दोन दशकांपुर्वी शेतात नर्सरीला सुरुवात केली. त्यांनी नर्सरीमध्ये वेगवेगळ्या फुला-फळांच्या झाडांची नर्सरी केली आहे. त्यांच्या या व्यवसायातून त्या महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.

२० वर्षांपासून त्यांचा या व्यवयात संघर्ष सुरु होता, आता मात्र त्यांना या व्यवसायात यश मिळाले आहे. कविता यांची १० एकर शेतीमध्ये जगदंबा नर्सरी आहे, तसेच त्यांनी ३०-३५ लोकांना रोजगारही दिला आहे.

आज त्यांच्या नर्सरीत वेगवेगळ्या फुला-फळांची झाडे आहे, त्यामध्ये ३० प्रकारचे विविध रंगी गुलाब, १५ वेगवेगळे प्रकारचे जास्वंद, शेवंती, जरबेरा, अशा वेगवेगळ्या प्राकारची शोभेची झाडे आहे.

तसेच त्यांच्याकडे आंबा, सीताफळ, डाळिंब, जांभुळ, आवळा, पेरुसारख्या १३० प्रकारच्या फुला-फळांची झाडे आहे. आता नर्सरीतले रोपं राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू अशा वेगवेगळ्या राज्यात पोहचली आहे.

या व्यवसायूत ते वर्षाला १ कोटींची उलाढाल करत आहे, तर वर्षाला ते ४० ते ५० लाखांची कमाई करत आहे. नर्सरी व्यवसाय करताना त्यांना स्पर्धक खुप होते, पण त्यांनी हार मानली नाही. आता त्यांना तब्बल २० वर्षांनंतर हे यश मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.