बापाशी भांडून पळून आलेली मुलगी, आज करतेय बॉलिवूडवर राज्य; वाचा तिचा संघर्षमय प्रवास

0

 

सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत खुप चर्चेत असते. अशात तिला आता मनकर्णिका या चित्रपटातल्या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी..

कंगना राणावतने आज आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण सुरुवातीच्या काळात तिला खुप संघर्ष करावा लागला होता, पण तिने कधीच संकटांमुळे माघार घेतली नाही आणि प्रत्येक संकटावर मात करत गेली.

कंगनाचा जन्म अशा कुटुंबात झाला होता, जिथे महिलांना अभिनय करण्याची परवानगी नव्हती. तिच्या वडिलांची इच्छा होती की कंगनाने डॉक्टर बनावे. पण बारावीच्या परीक्षेत ती नापास झाली होती. तेव्हा तिचे वडिल खुप नाराज झाले होते. त्यामुळे तिच्या वडिलांचे आणि तिचे भांडण झाले होते.

कंगना फक्त १७ वर्षांच्या वयात ती मुंबईला निघून आली होती. सुरुवातीच्या काळात तिला खुप संघर्ष करावा लागला होता, अनेकदा तिच्याकडे खायला पैसे नसायचे, ती काही रात्र मुंबईच्या रस्त्यांवर सुद्धा राहिली होती.

२००६ मध्ये आलेल्या गँगस्टर चित्रपटातून कंगनाने डेब्यु केला होता. त्या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यु अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. कंगना राणावत ही अशी एकमेव अभिनेत्री असेल जिच्या चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याची गरज नाही पडत.

कंगणा एखाद्या अभिनेत्याशिवायाच चित्रपटाला सुपरहिट बनवून टाकते. कंगनाला फॅशल, क्वीन, तनू वेड्स मनू, मणिकर्निका, पंगासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

कंगनाच्या कमाई बद्दल बोलाल, तर ती एका चित्रपटासाठी ११ कोटी रुपये घेते. तर वेगवेगळ्या जाहिराती, सोशल मिडिया आणि ब्रँड प्रमोशनमधून ती करोडोंची कमाई करते. कंगनाअभिनेत्री तर आहेच सोबत ती एक प्रोड्युसर सुद्धा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.