कौतुकास्पद! कमी पगार असून ‘हा’ हवालदार करतोय दरमहिन्याला गरजू लोकांना १० हजारांची मदत

0

 

सध्या समाजात खूप कमी लोक अशी असतात असतात, जी आपल्या कुटुंबासोबतच समाजातल्या गरजू लोकांचाही विचार करतात. तसेच त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. आजची ही गोष्ट अशा एका माणसाची आहे जो आपल्या प्रत्येक पगारातून १० हजार रुपयांची गरजूंना मदत करतो.

या माणसाचे नाव आहे के. कृष्णा मूर्ती. कृष्णा मूर्ती हे एक कॉन्स्टेबल असून ते आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम पोलीस स्टेशनमध्ये कामाला आहे. कोरोना काळात अनेक गरजू लोकांच्या मदतीला ते धावून आले आहे.

कृष्णा यांचा पगार कमी असताना, त्यांनी आपल्या पगारातून १० हजार रुपये काढून लोकांना मदत केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात अनेक गरीब आणि गरजू लोकांना त्यांची मदत झाली आहे.

कृष्णा श्रीकाकुलम पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदण्याचे काम करतात. ते नेहमीच गरजू लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. जेव्हा पण कोणती गरीब किंवा गरजू व्यक्ती तक्रार नोंदवते, तेव्हा कृष्णा त्या व्यक्तीला मदत करतात.

कृष्णा दरमहिन्याला आपल्या पगारातून १० हजार रुपये गरजू लोकांच्या मदतीसाठी काढत असतात. ते बाजूला काढून ठेवलेल्या पैशातून गरिबांना अन्नधान्य आणि कपडे पुरवतात. सध्या हिवाळा सुरू असल्याने ते गरजू लोकांना चादरी आणि ब्लॅंकेटसुद्धा वाटत आहे.

कृष्णा २०१७ पासून लोकांना मदत करत आहे. ते महिन्याला ३० लोकांना मदत करतात. कृष्णा यांना गरजूंना मदत करण्याची प्रेरणा आई वडील आणि आजी आजोबांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कृष्णा यांना महिन्याचा पगार ४५ हजार असून ते दर महिन्याला १० हजार रुपये काढून ठेवत असतात. त्या काढून ठेवलेल्या पैशातून कृष्णा महिन्याला ३० लोकांना मदत करतात. ते महिन्याच्या ५ किंवा ६ तारखेला लोकांची मदत करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.