१० वर्षे मेहनत घेऊन बनवली भन्नाट मशीन, ४० सेकंदात सोलून काढते पूर्ण नारळ

0

 

 

नारळाचे पाणी प्यायला किंवा त्याच्यातले खोबरे खायला प्रत्येकालाच आवडते पण ते नारळ सोलायला कोणालाच आवडत नाही. कारण त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. अशात केरळच्या एका माणसाने हे पाहिले आणि त्याने नारळ सोलायची मशीनच बनवून टाकली.

केरळच्या त्रिशूरमध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव केसी सियोज असे आहे. सियोज यांनी मशीन बनवल्यानंतर आता त्यांना केंद्र सराकारकडून २५ लाख रुपायांचे ग्रांट मिळाले आहे. त्यामुळे आता सियोज यांनी स्वत:चीच कंपनी सुरु केली आहे.

बाजारात नारळ सोलण्याच्या अनेक मशीन आहेत, पण सियोज यांनी तयार केलेली ही मशीन दुसऱ्या मशीनपेक्षा हायटेक आहे. सियोज यांनी तयार केलेल्या मशीनने नारळचा कठिण भागही फोडता येऊ शकतो.

सिजोय यांनी ‘नेत्तूर टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशन‘ (NTTF) मधून ‘टूल एँड डाई मेकिंग’चा  कोर्स केलेला आहे. त्यानंतर ते सौदी अरेबियाला नोकरीसाठी चालल्या गेले होते. २००५ मध्ये ते पुन्हा भारतात आले. तेव्हा त्यांनी बघितले की नारळच्या मदतीने अनेक जण उपजिविका करत होते, कोणी नारळ विकत होते, तर कोणी नारळांच्या झाडांची लागवड करत होते.

तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की लोकांना नारळ सोलायला खुप अडचणी येत आहे. त्यामुळे त्यांनी नारळ सोलण्याच्या मशीनींचा  शोध घेतला पण त्यांना कच्चे नारळ सोलण्याच्या मशीन मिळाल्या. त्यानंतर त्यांनी स्वत: मशीन बनवण्याचा निर्णय घेतला.

१० वर्षे मेहनत घेऊन त्यांनी एक खास प्रकारची मशीन तयार केली. या मशीनने फक्त ४० सेकंदात नारळ सोलले जाते, विशेष म्हणजे नारळाचा सोलण्यासाठी कठिण असणारा भागही ही मशीन सोलून काढते. २०१७ साली त्यांना यासाठी पेटंट मिळाले आहे.   त्यांना आणखीन अशा मशीन तयार करायच्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.