“बाजारात नर्सचा युनिफॉर्म घालून जायचे तर दुकानवाले सामान न देता हाकलून द्यायचे”

0

 

कोरोनाच्या संकटाने देशभरात थैमान घातलेले आहे. कोरोना रूग्णांना वेळेत उपचार मिळावा, यासाठी कोरोनाचा योद्धे दिवसरात्र धडपड करताना दिसून येत आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका नर्स बद्दल सांगणारा आहोत, जिने कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा करण्यासाठी सहा महिने सुट्टी घेतलेली नाही. या नर्सचे नाव ज्योती पवार असे आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका ज्योती पवार आणि त्यांच्या टीमने कोरोना काळात सहा महिने एकही सुट्टी न घेता सलग काम केले आहे. तसेच साप्ताहिक सुट्टी देखील त्यांनी घेतली नाही.

एप्रिल महिन्यात रोज नवीन नवीन रुग्ण येत असल्याने त्यांचे रक्त तपासणे, त्यांना वेगळी रूम करून देणे त्यांची सेवा करणे यातच सगळा वेळ निघून जात असल्याचे ज्योती यांनी म्हटले आहे. रोज नवीन रुग्ण येत असल्याने त्यांना सुट्टी घेण्यासाठी वेळच मिळायचा नाही.

अनेकदा ज्योती २४ तास कामावर असायच्या. त्याना दोन मुले असून त्या एकट्याच दोघांना सांभाळत असतात. त्यामुळे रुग्णालयासोबत त्यांना घराकडे पण लक्ष द्यावे लागायचे.

कोरोनाच्या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांची घरची मोलकरणी देखील कोरोनाच्या भीतीने काम सोडून गेली होती. तसेच त्या नर्स असल्यामुळे त्यांना लवकर दुकानात सुद्धा घेत नसल्याचे ज्योती पवार यांनी म्हटले आहे.

अनेकदा कामावरचा युनिफॉर्म मी बाजारात घालून जायचे, तर लोक मला समान न देताच हाकलून द्यायचे. मला याचे खूप वाईट वाटायचे, असेही ज्योती यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या काळात आपण आपला आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना अपराधी झाल्यासारखं वाटायचे. पण त्यांनी कधीही आपले काम सोडले नाही आणि नेहमीच रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर राहिल्या.

हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाने चांगले काम केले होते, त्यामुळे कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी ज्योती पवार यांचाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.