खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या मिसळीची सुरुवात कशी झाली माहितीय का? वाचा..

0

नाशिकमध्ये अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. मग ते पुरातन वाडे असो, निसर्गरम्य ठिकाणे असो माणूस कधी कंटाळून जात नाही. या प्रवासात खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे मिसळ.

नाशिक म्हटलं की डोळ्यासमोर येते नाशिकची तर्रीबाज मिसळ. पण तुम्हाला माहित आहे का? नाशिकची तर्रीबाज मिसळ कधी सुरू झाली आणि कोणी सुरू केली? काही जुन्या पिढीतील लोक सांगतात की साधारण ९० ते १०० वर्षांपुर्वी काही जण घरून मिसळ बनवून आणायचे आणि गोदा घाटावर विकायचे.

मिसळच्या बाबतीत नाशिकही खुप फेमस आहे. या मिसळने नाशिकला एक जागतिक ओळख निर्माण करून दिली आहे. नाशिकला जगाच्या पाठीवरून कोणीही येऊ मिसळ खाल्याशिवाय पुढे जात नाही.

आधीच्या काळात नाशिकमध्ये भाजीबाजार, धान्यबाजार, दूधबाजार, बैलबाजार असे सगळे बाजार भरत असत. त्यामुळे खेड्यातून आलेले लोक येताना फक्त भाकरी घेऊन येत असत आणि तेथे आल्यावर मिसळ विकत घेत असत.

मिसळसोबत पाव आता अलिकडच्या काळात आला. आधीच्या काळात मिसळमध्ये मटकीची उसळ, थोडे फरसाण, पोहे आणि रस्सा एवढेच पदार्थ असायचे. नाशिकमध्ये जुन्या काळी एक मिसळ खुप फेमस होती ती म्हणजे गंगा टी हाऊसची मिसळ.

आणखी एक मिसळ म्हणजे कमला विजयची मिसळ. या हॉटेलचे वैशिष्ट्य असे होते की येथे सकाळी नाशिकची मिसळ मिळत असे आणि संध्याकाळी पुणेरी मिसळ मिळत असे. नंतर १९१२ मध्ये भगवंतराव टी हाऊसमध्ये मिसळ मिळू लागली. जुन्या काळात नाशिकमध्ये साधना मिसळही खुप फेमस होती.

आज मिसळचे भाव १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत पण एकेकाळी हीच मिसळ २५ पैशाला मिळत होती. असे म्हणतात ७० वर्षांपुर्वी जुन्या नाशिकमध्ये चव्हाट्यावर सुरू झालेल्या सीताबाई मोरे यांच्या मिसळचा खुप मोठा वाटा आहे. आजही येथे बशीत केवळ मिसळ मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.