हा तरुण ‘अशी’ करतोय बटाट्याची शेती अन् कमवतोय वर्षाला २५ करोड

0

 

भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे इथे शेतीमध्ये लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्या प्रयोगातुन शेतीकरी लाखो रुपये कमवतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत. जो शेतकरी महिन्याला कोट्यवधी रुपये कमवत आहे.

गुजरातमध्ये राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव जितेश पटेल असे आहे. जितेश बटाट्याची शेती करून वर्षाला २५ कोटींपेक्षा जास्त रुपये कमवत आहे. त्यांनी बटाट्याची लेडी रोसेटा प्रकारची शेती केली आहे.

जितेश अरावली जिल्ह्याच्या दौलपूर कंपा गावात राहतात. जितेश यांना मिळून १० जण त्यांच्या कटुंबात आहे. हे दहा जण मिळून सरासरी २० हजार मेट्रिक टन बटाट्यांचे उत्पादन घेत आहे.

या बटाट्याचा उपयोग वेफर्स आणि चिप्स बनवण्यासाठी केला जातो. बालाजी आणि आयटीसी सारख्या कंपनींना हे बटाटे आणि वेफर्स बनवण्यासाठी पुरवले जातात.

जितेश पटेल गेल्या २६ वर्षांपासून शेती करत आहे. जितेश यांनी २००५ मध्ये एग्रीकल्चरमध्ये एमएससी केली होती. त्यानंतर त्यांनी चिप्ससाठी वापरल्या जाणाऱ्या बटाट्याची शेती केली.

२००७ मध्ये जितेश यांनी १० एकर जिमिनीत लेडी रोसेटा नावाच्या प्रकारचे बटाटे लावले आहे. या शेतीत त्यांना चांगलाच नफा झाला त्यांनंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना सुद्धा ही शेत करण्यास सांगितले.

सध्या सगळे मिळून १००० एकर जमिनीत बटाट्याची शेती करत आहे. या शेतीतून ते वर्षाला जवळपास २५ कोटींपेक्षा जास्त पैसे कमवत आहे. बाजारात सध्या या बटाट्यांची चांगलीच मागणी आहे, त्यामुळे त्यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे या शेतीतून त्यांना चांगलाच फायदा होता दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.