१ वर्षाचे असताना बाळाचे वडिल वारले, आईने कष्टाने सांभाळून तहसीलदार बनवले

0

 

माणसाची परिस्थिती कशीही असे, तो कितीही  मोठ्या संकटात असो, जर माणसाची ध्येय गाठण्याची जिद्द असेल, तर तो नक्कीच एकेदिवशी  त्याचे ध्येय गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे जितेंद्र शिकतोडे.

जितेंद्र शिकतोडे हे आता तहसीलदार बनले आहे, पण त्यांचा इथपर्यंतचा संघर्ष खुप कठिण होता. शिकतोडे हे सामान्य कुटुंबातून येतात. ते तहसीलदार बनण्यात त्यांच्या आईचे मोठे योगदान आहे.

शिकतोडे यांची आई लता शिकतोडे यांनी मंगळवेडा नगरपरिषदेत सफाई कामगाराचे काम करुन, कष्ट घेऊन आपल्या मुलाला शिकवले आणि तहसीलदार बनवले आहे. शिकतोडे हे चामोर्शीचे तहसीलदार आहे.

जितेंद्र जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर मुलाची पुर्ण जबाबदारी लता शिकतोडे यांच्यावर आली. त्यांनी पाच-दहा रुपयांवर रोजंदारीने काम करण्यास सुरुवात केली आणि कष्ट घेत मुलाला शिकवले.

जितेंद्र यांनाही आपल्या आच्या कष्टाची आणि आपल्या परिस्थितीची जाणीव होती, त्यामुळे त्यांनी अभ्यास करताना कष्ट घेतले. त्यांनी मंगळवेढा प्राथमिक शिक्षण घेतले, त्यांतर त्यांनी महाविद्यालयाचे शिक्षण घेतले, तसेच डीएडचा अभ्यासक्रम पुर्ण केला.

२०१५ मध्ये बीए राज्यशास्त्रची पदवी त्यांनी घेतली आणि स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु केला. २०१८ मध्ये त्यांनी एमपीएससीची परिक्षा पास केली आणि २०१९ मध्ये ते तहसीलदार झाले.

शिकतोडे यांना आपल्या परिस्थितीची जाणीव होती, त्यामुळे त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना कुठेही शिकवणी लावली नाही. त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आणि आपल्या तहसीलदार बनून आपल्या आईचे स्वप्न पुर्ण केले आहे.

मुलगा तहसीलदार झाल्यानंतरही त्या सफाई कर्मचाऱ्याची नोकरी करत होत्या. पण आपल्या मुलाच्या अग्रहानंतर त्यांनी आता सफाई कर्मचाऱ्याची नोकरी सोडली आहे. एक सफाई कर्मचाऱ्याची नोकरी करणाऱ्या महिलेचा मुलगा तहसीलदार झाल्याने सगळीकडेच शिकतोडे यांचे कौतुक केले जात आहे, त्यांच्या या यशात त्यांच्या आईचाही सिंहाचा वाटा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.