माणुसकीला सलाम! वाचा रिक्षावाल्या काकूंबद्दल ज्या अपंग आणि अंध लोकांना देतात प्रवासाची मोफत सेवा

0

 

 

लोकांचे रिक्षावाल्या सोबतचे एक वेगळेच प्रकारचे नाते असते, काहींचा रिक्षावाला खुप ओळखीचा झालेला असतो, तर काही लोकांना रिक्षावाले फसवी वाटतात. पण बऱ्याचवेळा आपण अशा घटना बघत असतो, जेव्हा एखादा अनोळखी रिक्षावालाचा मदतीला धावून येतो.

आज आम्ही तुम्हाला एक रिक्षाचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या काकांची नाही तर काकूंची गोष्ट सांगणार आहोत, ज्या पुणेकरांसाठी अभिमानास्पद ठरत आहे.

संसार चालवत असताना आपले समाजाला काही देणे बनते म्हणून या काकूंनी अंध आणि अपंग लोकांसाठी मोफत रिक्षासेवा सुरु केली आहे. रिक्षा चालवणाऱ्या या काकूंचे नाव जयश्री अब्राहम असे आहे. अपंग आणि अंध लोकांसाठी त्यांनी सुरु केलेल्या सेवेचे सगळीकडेच कौतुक होत आहे.

जयश्री या भोसरी परिसरात आपल्या पती आणि दोन मुलांबरोबर राहतात. जयश्री यांचे पतीही रिक्षाचालक आहे. रिक्षा चालवून मिळणाऱ्या पैशांवरच दोघे मिळून घर सांभाळत आहे.

गेल्या आठ वर्षांपासून जयश्री वाहनचालकाचे काम करत आहे. त्या सुरुवातीला शाळेत जाणाऱ्या विद्यार्थांसाठी वाहन चालवायच्या. आता गेल्या दोन वर्षांपासून त्या रिक्षा चालवत आहे.

रिक्षा चालवताना त्यांना समाजकार्याचे काम करायचे होते. त्यामुळे त्यांनी रिक्षा व्यवसाय सुरु झाल्यानंतर अंध आणि अपंग व्यक्तींना मोफत सेवा देण्याचे काम सुरु केले.

सध्या दिव्यांग लोकांना रोजच्या जीवनात खुप अडचणींना सामोरे जावे लागत असते. तेव्हा जयश्री यांना असे लक्षात आले की दिव्यांग लोकांना प्रवासात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांनी रिक्षा चालवण्यासोबतच दिव्यांगांना सेवा देण्याचे कामही सुरु केले.

जयश्री दिवसभर शहरात रिक्षा चालवत असतात. तसेच त्या सकाळी बसस्टॉपवर थांबतात. तिथे त्यांना जे लोक मिळतात, जयश्री त्यांना पत्ता विचारतात आणि त्या पत्त्यावर सोडतात. त्यांच्या या कामाचे सध्या सगळीकडेच कौतुक केले जात आहे. लोकांची सेवा करुन मला आनंद मिळतो, असे जयश्री यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.