जिथे जिथे जयललिता तिथे तिथे त्यांची खुर्ची; वाचा नेमका किस्सा..

0

 

राजकाराणतील नेत्यांचे आपल्या खुर्चीवर किती प्रेम असते हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. आपण राजकारणाच्या खुर्चीचे अनेक किस्से पाहिले असतील.

अनेक मोठे नेते एखाद्या खुर्चीवर बसले की, ते उठायचं नाव घेत नाही पण काही नेत्यांचं म्हटलं तर त्यांचं काही वेगळंच असतं. आज जाणून घेऊया तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या खुर्चीबद्दल.

जयललिता जेव्हा पण कोणत्या दौऱ्यावर जायच्या त्यांची आवडती खुर्ची त्यांच्याबरोबर असायची. २०१४ मध्ये त्या तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.

जेव्हा त्या जेटली यांना भेटायला गेल्या तेव्हा पण जयललिता आपली खुर्ची सोबत घेऊन
गेल्या. त्या जिथे जिथे जायच्या तिथे त्या आपली आवडती खुर्ची घेऊन जायच्या.

जयललिता जेटली यांना नॉर्थ ब्लॉकला भेटण्यासाठी गेल्या तिथेही त्यांची खुर्ची गेली. भेटीदरम्यान जयललिता त्यांच्या आवडत्या खुर्चीवरच बसलेल्या होत्या. जयललिता यांची ही खुर्ची अरुण जेटली यांच्या खुर्चीपेक्षा आरामदायक होती.

अरुण जेटली आणि जयललिता यांची भेट जेव्हा पूर्ण झाली, तेव्हा ती खुर्ची पुन्हा तामिळनाडू भवनात परत पाठवण्यात आली.

खरं तर जयललिता यांना संधीवताचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यासाठी सागवानची खास डिझाईन असलेली खुर्ची तयार करण्यात आली होती. ही खुर्ची दिल्लीतल्या तामिळनाडू भवनात असते.

त्यांच्या संधीवातामुळे जयललिता दिल्ली दौऱ्यावर जिथे जिथे जायच्या तिथे तिथे त्यांची खुर्ची यायची. मग ते संसदेची लायब्ररी असो किंवा राष्ट्रपती भवन

Leave A Reply

Your email address will not be published.