१० वर्षाच्या चिमुकल्याने विकले ‘या’ कंपनीचे शेअर अन् एका झटक्यात झाला लखपती

0

 

आजकाल सगळीकडेह शेअर मार्केटची चर्चा सुरू असते. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरचा भाव कधी वाढेल आणि कोणत्या शेअरचा भाव कधी उतरेल हे सांगतायत नाही. त्यामुळे अनेक लोक शेअर विकत घेऊन त्याची किंमत वाढल्यावर ते विकून पैसा कमवत असतात.

अशात आता एका दहा वर्षाच्या चिमुकला शेअर विकून एका दिवसात लखपती झाला आहे. या चिमुकल्याचे नाव जेडीन कार असे आहे. गेल्यावर्षी त्याच्या आईने त्याच्या नावावर शेअर्स विकत घेतल्याने जेडीन लखपती झाला आहे.

जेडीनच्या नावावर असलेले गेम स्टॉप कंपनीचे शेअर त्याने बुधवारी विकले. त्याला हे शेअर विकून ३ हजार २०० डॉलर्सचा नफा झाला म्हणजेच याची किंमत भारतीय रुपयांमध्ये साधारण २ लाख ३३ हजारांपेक्षा जास्त होते.

जेडीन हा एका झटक्यात लखपती झाल्याने सर्वातर त्याचीच चर्चा होत आहे. हे शेअर्स त्याच्या आईने त्याला गेल्यावर्षी भेट म्हणून दिले होते. दोघेही सॅन अंटेनिओ इथे राहतात.

जेडीनच्या आईचे नाव नीना असे आहे. तिने डिसेंबर २०१९ मध्ये गेम स्टॉप या व्हिडीओ गेम कंपनीचे १० शेअर्स ६० डॉलर्समध्ये विकत घेतले होते आणि तिचा मुलगा म्हणजे जेडीनला भेट दिले होते.

या आठवड्यात गेम स्टॉपच्या शेअर्सच्या किंमत तेजीने वाढ झाली आहे. नीनाचे सर्व लक्ष गेम स्टॉपच्या शेअर्सकडे होते. शेअर्सच्या किमती पाहता तिने तिच्या मुलाला शेअर ठेवायचे की विकायचे याबाबत विचारणा केली, तर याने विकून टाक असे म्हटले, त्यामुळेच त्यांना हा नफा झाला आहे.

तीन आठवड्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त १८ डॉलर इतकी होती. पण गेला चार दिवसांत याच्या किंमतीमध्ये दुप्पटीने झाली आहे. आता या शेअरची किंमत ३४७.५१ इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.