इंटरनेटवर माहिती काढून ‘या’ शेतकऱ्याने केली चंदनाची शेती अन् झाला मालामाल

0

 

 

 

आज अनेक लोक शेती व्यवसाय सोडून नोकरीच्या शोधात असतात, पण काही लोक नेहमीच शेतात वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला दिसून येतात. आजची ही गोष्ट पण अशाच एका शेतकऱ्याची आहे.

राजस्थानच्या एका शेतकऱ्याने इंटरनेटवरून माहिती काढून एक वेगळाच प्रयोग केला आहे. इंटरनेटच्या सहाय्याने या शेतकऱ्याने माहिती काढली आहे आणि चंदनाची शेती केली आहे. या शेतीतून त्याची भरघोस कमाई झाली आहे.

श्रीगंगानगरच्या सादुलशहरात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव जसवंत ढिल्लो असे आहे. आपल्या कष्टाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी चंदनाची शेती केली आहे. आज पूर्ण श्रीगंगानगर जिल्ह्यात जसवंत यांच्या चंदनाचा सुगंध दरवळत आहे.

जसवंत ययांना आपल्या जमिनीवर काहीतरी वेगळा प्रयोग करायचा होता. त्यासाठी त्यांनी इंटरनेटवरून माहिती काढली. तसेच बँगलोरला जाऊन त्यांनी पीक लागवडीसाठी दहा दिवसांचे प्रशिक्षण पण घेतले.

त्यांना चंदनाची शेती करण्याचे ठरवले. त्यामुळे पुढे त्यांनी गुजरातच्या एका शेतकऱ्याशी संपर्क साधला. त्यांनी त्या शेतकऱ्याकडून चंदनाच्या शेतीची माहिती घेतली. त्या शेतकऱ्याने चंदनाची २ हजार झाडे लावली होती. पण त्यातली फक्त १५० झाडे जगली होती.

तरीही जसवंत यांनी चंदनाची शेती करण्याचा निर्णय घेतला. चंदनाचे झाड ५ वर्षानंतर सुगंध देऊ लागते. १० ते १५ वर्षांनंतर हे झाड पूर्णपणे तयार होते. झाडावरील हार्डवूडची किंमत त्याच्या किंमतीवर अवलंबून असते. चंदनाचे एक झाड २ ते ३ लाखाला विकले जाते.

चंदनाच्या झाडाच्या फांद्या विकून पण पैसे कमवले जातात, असे जसवंत यांनी सांगितले आहे. भारताच्या दक्षिणेत ४ ते ५ राज्यांमध्ये चंदनाची शेती करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. पण राजस्थानमध्ये चंदनाची शेती करण्यासाठी कुठलीही परवानगीची गरज पडत नाही, असे जसवंत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.