पाच रुपयाला असणाऱ्या ‘या’ वस्तूंचा व्यवसाय केला सुरू, आता महिन्याला कमवतेय लाखो रुपये

0

 

जर एखादा माणूस जिद्द आणि चिकाटीने आपल्या ध्येयाकडे धाव घेत असेल तर एक दिवस त्याला यश नक्की मिळते. याचे उत्तम उदाहरण आहे हरियाणाची जपना ऋषी.

एकेकाळी ६ बाय ४ च्या खोलीत सुरु केलेला व्यवसाय जपनाने मेहनतीच्या जोरावर ३ कोटींपर्यत पोहचवला आहे. जर व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे चांगली कल्पना असेल आणि तो व्यवसाय उंचीवर नेण्याची तुमची जिद्द असेल, तर तुम्ही नक्कीच तुमच्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतात, हे जपनाने सिद्ध करुन दाखवले आहे.

हरियाणामध्ये पटियालाजवळ राहणाऱ्या जपनाने एका छोट्या खोलीत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती. ही इतकी छोटी जागा होती की त्यात सतरंजी टाकता येईल एवढी जागा होती, त्यात एक माणूस नीट राहू शकेल, एवढीही जागा नव्हती.

जपनाने पटियालामधल्या पंजाब विद्यापीठातून फुड टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तरचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने नोकरी नेस्ले, कोका कोलासारख्या मोठ्या कंपन्यात काम सुरु केले. त्यावेळी तिने भारतातील कुपोषणाबाबत वाचन केले होते.

त्यामुळे २०१६ मध्ये तिने आपले पती विवेकसोबत कौशिक यांच्यासोबत हंग्री फॉयल नावाची कंपनी सुरु केली. तेव्हा तिने पाच आणि दहा रुपयांत विकले जाणारे केक तयार केले आणि ते विकण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी गरीबांपर्यंत पोषक पदार्थ पोहचवण्ये काम सुरु केले.

त्यासाठी त्यांनी नट लाईट सुरु केले. त्याच्या सुका मेवा म्हणजेच काजू, बदाम, यांचा समावेश केला. त्यांनी या सर्वांची किंमत कमी ठेवली.

त्यांच्या या व्यवसायाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता त्यांचे प्रॉडक्टची दिल्ली, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यात विक्री केली जाते.

जपना यांची कंपनी खुप कमी दरात आरोग्यला चांगला असणारा सुका मेवा लोकांना मिळत असल्याने दिवसेंदिवस त्यांचे ग्राहक वाढत चालले आहे. बाकीच्या कंपन्यांच्या सुका मेव्याची किंमत ५० रुपयांपासून सुरु होते, तर जपना यांच्या कंपनीच्या सुका मेव्याची किंमत १० रुपयांपासून सुरु होते. जपना यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३ कोटी इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.