सुरुवातीला मधाचे फक्त ३० बॉक्स विकले, आता महिन्याला करतोय लाखोंची कमाई

0

 

 

सध्याच्या परिस्थितीत नोकरी करण्यापेक्षा लोकं स्वता:चा व्यवसाय सुरु करण्याला प्राधान्य देत आहे. अनेक लोक तर हातातली नोकरी सोडून स्वता:चा व्यवसाय सुरु करतात, पण यश त्यांनाच मिळते ज्यांची कल्पना अनोखी असते.

आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्या माणसाने शिक्षकाची नोकरी सोडून मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरु केला आणि या व्यवसायातून तो आता वर्षाला ५० लाख रुपयांची कमाई करत आहे.

हरियाणाच्या झज्जरमध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव जगपाल सिंग फोगाट असे आहे. जगपाल सिंग यांनी बी.एड केलेले आहे. त्यांनी जवळपास २० वर्षे शिकवण्याचे काम केलेले आहे.

जगपाल सिंग सध्या मधमाशी पालनाचा व्यवसाय करत आहे. ते या व्यवसायातून दरवर्षी ६० ते ७० क्विंटल मधाचे उत्पन्न घेतात. या व्यवसायातून दरवर्षी ५० लाखांपेक्षा जास्त रुपयांची कमाई करत आहे. या व्यावसायात त्यांची पत्नी मुकेश देवी सुद्धा त्यांच्यासोबत काम करत आहे.

सुरुवातीला त्यांनी मधमाशी पालनाविषयीची पुस्तके वाचली होती, तर काही माहिती त्यांनी मधमाशीपालन करणाऱ्या लोकांकडून मिळवली. २००१ मध्ये त्यांनी नोकरीसोबतच ३० मधाचे बॉक्स विकून मध विकण्याचा व्यवसाय सुरु केला.

ते सुरुवातीला मध मध बनवणाऱ्या कंपनीला द्यायचे, पण त्यातून त्यांना त्या मधाची कमी किंमत मिळायची. त्यामुळे त्यांनी स्वता:चा ब्रँड तयार करण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये जगपाल सिंग यांनी नोकरी सोडून पुर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केले.

२०१६ मध्ये त्यांच्या पत्नीने मधमाशी पालनाची पुर्ण ट्रेनिंग घेतली आणि त्यांनी प्रोसेसिंगचे काम करण्यास सुरुवात केली. आज जगपाल १० पेक्षा जास्त प्रकारचे मध तयार करतात. ज्यामध्ये तुळस मध, अजवाईन मध, जामुन मध, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मध ते बनवतात.

आपल्या प्रॉडक्टच्या मार्केटींगसाठी जगपाल सिंग यांनी व्हॉट्सऍप ग्रुप बनवला आहे. जेव्हा पण एखाद्या ग्राहकाला मधाची गरज पडते, तो ग्राहक त्या ग्रुपवर मॅसेज करतो, तेव्हा जगपाल ग्राहकाच्या पत्त्यावर मधाचे कुरियर करतात.

महिन्याला जवळपास २०० ऑर्डर येतात, असे जगपाल यांनी म्हटले आहे. हा मध ते दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशसोबत अनेक राज्यात पाठवतात. या व्यवसायातून त्यांनी २० लोकांना रोजगारही दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.