या माणसाने एक दोन नाही तर चक्क चौदाशे एकरचे जंगल केले उभे; जाणून घ्या कसं…

0

 

सध्या पर्यावरणाचा नाश होताना आपल्याला दिसत आहे. अशात जंगलतोड करून तिथे वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहे. याचे भयानक परिणाम लोकांना दिसून येत असल्याने आता ‘झाडे लावा झाडे जगावा’च्या घोषणा दिल्या जात आहे.

त्यामुळे अनेक लोक झाडे लावताना दिसून येतात. मात्र ते आपल्या परिसरात एक दोन झाडे किंवा जास्तीत जास्त बाग लावतात. मात्र तुम्हाला माहितीये का आसामच्या एका माणसाने १३६० एकर जागेत जंगल उभे केले आहे. एवढे मोठे जंगल तयार करणे कोणताही माणूस कल्पनाही करू शकत नाही पण हे सत्यात आणले आहे जादव पायेंग यांनी.

आता जंगलामुळे अनेक प्राण्यांना जीवनदान दिले आहे. आज हे जंगल वाघ, गेंडे, हरीण, हत्ती, माकड, ससे, गिधाडे, असे अनेक प्राण्यांचे निवासस्थान झाले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जादव यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे.

४० वर्षांपासून सुरू असलेले हे त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहे. १९६३ मध्ये जादव पायेंग यांचा जन्म झाला आहे. ब्रम्हपुत्रा नदीचे काठी वसलेले शहर जोहराटचे ते रहिवासी. ब्रम्हपुत्राला सतत पूर येण्यामुळे तिथल्या मातीची झीज झाली होती. त्यामुळे तिथले तिथला सर्व भाग वाळवंट झाला होता.

१९७९ मध्ये आलेल्या पुरामुळे तिथल्या भागांचे मोठे नुकसान झाले होते, तेव्हा जादव हे १६ वर्षांचे होते. तेव्हा पुरानंतर जादव हे बेटाजवळ गेले तिथे त्यांना असंख्य मेलेले साप आढळले. त्यांना प्राण्यांशी खूप लगाव होता, त्यामुळे त्यांनी यामागचे कारण शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असे कळले की, हे सर्व जंगतोड झाल्यामुळे होत आहे.

तेव्हा त्यांनी अनेकांना झाडे उगवण्याबाबत सांगितले. मात्र सगळ्यांनी त्याला ही जमीन वाळवंट झालीये इथे झाडे उगवणे शक्य नसल्याचे सांगितले, तसेच तुला जमलं तर तूच कर असेही अनेक लोकांनी सांगितले. यावर जादवने २० बांबूची रोपे घेऊन एक कुंपण केले आणि तिथे ती रोपे लावली.

ती रोपे खरोखर लागली. तेव्हा त्यांनी पूर्ण बेट हिरवेगार करण्याचे ठरवले आणि त्याविचाराने त्यांनी कष्ट घेण्यास सुरुवात केली. असे असताना १९७९ मध्येच आसामच्या वनविभागाने ५०० एकर जागेवर जंगल उभारणी करण्याचे ठरवले. त्यासाठी अनेक मजूर नेमले गेले त्यात जादव देखील होते.

काही काळानंतर हे काम बंद पडले. सर्व मजूर शहराकडे निघून गेले. जादव मात्र तिथेच राहिले, त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.  दररोज कंटाळा न करता आणि एकर, हेक्टर न मोजता आपले झाडे लावण्याचे काम सुरूच ठेवले. असे करत करत ४० वर्षात त्यांनी जवळपास चौदाशे एकरचे घनदाट जंगल उभे केले.

जादव यांना लाडाने मोलाई म्हणतात त्यामुळे या जंगलाचे नाव देखील ‘मोलाई जंगल’ असे ठेवण्यात आले. जादव यांच्या या कार्याची माहिती जगाला २००८ साली झाली. तेव्हा पासून जाधव यांना अनेक पुरस्कार मिळाले.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने २२ एप्रिल २०१२ ला  जादव यांचा सत्कार केला. तसेच त्यांना ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ हा पुरस्कार दिला. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुलकलाम यांनी देखील जादव यांचा सत्कार केला आहे. २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.