वडील कुक होते तर आई हाऊसकीपर, जॅकी चैनबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

0

तुम्ही जर चायनिज किंवा हॉलिवूड चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला जॅकी चैन नक्कीच माहित असेल. जॅकी चैन एक खुप नावाजलेले अभिनेते आहेत. आपल्या चित्रपटात ते ज्या प्रकारे स्टंट्स करतात तसेच कॉमेडी करतात त्यामुळे त्यांचे पुर्ण जगात खुप चाहते आहेत.

त्यांच्या प्रत्येक चित्रपटात तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल. ते १९७० पासून अभिनय करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. पण खुप कमी लोकांना माहित आहे की जॅकी चैन यांचा स्वभावही खुप दिलदार आहे.

त्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे पण त्यांना या संपत्तीचा जरासाही घमंड नाहीये. आज आपण त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. जॅकी यांचे म्हणणे आहे की ते आपल्या संपत्तीतील एक पैसाही आपल्या मुलाला देणार नाहीत.

ते एका मुलाखतीत म्हणाले होते की, मी माझी सगळी संपत्ती दान करणार आहे. त्यांचे म्हणणे आहे की माझ्या मुलाने स्वता पैसै कमवून दाखवले पाहिजे ज्यामुळे त्याला पैशांचे महत्व कळेल. असे म्हणतात की जॅकी जगातील सर्वात मोठ्या समाजसेवकांमधील एक आहेत.

त्यांनी असा प्रण केला आहे की सर्व संपत्ती चांगल्या कार्यासाठी वापरणार आहेत. त्यांनी जगभरात गरीब मुलांसाठी आणि लोकांसाठी शाळा आणि कॉलेज खोलले आहेत. जॅकी युनिसेफसारख्या संस्थेशीही जोडलेले आहेत.

वेळोवेळी ते चॅरिटी इव्हेंट ठेवतात आणि खुप चॅरिटी फंड गोळा करतात. जॅकी चैन यांना ऐतिहासिक वस्तु गोळा करण्याचा खुप छंद आहे. असे म्हणतात की त्यांच्याकडे खुप ऐतिहासिक वस्तु आहेत. जसे की २००० वर्षांपुर्वीचा दरवाजा.

याव्यतिरीक्त पुर्ण जगभरात त्यांचे खुप आलिशान बंगले आहेत. त्यामध्ये हाँगकाँग, सिंगापुर, ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा समावेश आहे. तुम्ही जर पाहिले तर श्रीमंत लोकांकडे अनेक बॉडिगार्ड आणि ड्रायव्हर असतात पण जॅकी चैन कधीच ड्रायव्हर किंवा बॉडिगार्ड ठेवत नाहीत.

मुळात त्यांना ते आवडतच नाही. जॅकी ज्या ठिकाणी जातात स्वता गाडी चालवतात. एवढंच नाही तर ते गाडीसुद्धा स्वता पार्क करतात. जॅकी चैन सारखे अभिनेते तुम्हाला पुर्ण जगात सापडणार नाहीत. ते स्वताचे स्टंट्स स्वता करतात.

अनेकवेळा त्यांना स्टंट्स करताना दुखापत झाली आहे. त्यांना बऱ्याच चित्रपटांसाठी ऑस्करही मिळाला आहे. त्यांनी बॉलिवुडमध्येही काम केले आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.