..आणि त्याने चक्क १०० रूपयांत बनवली ak-47 रायफल, आयटीआय विद्यार्थ्याचा कारनामा

0

इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. तुमच्या मनात जर दृढ इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशाच एका पठ्ठ्याची आज आम्ही तुम्हाला कहाणी सांगणार आहोत.

आयटीआय महाविद्यालयात एनसीसीचा कॅम्प लागला होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आर्मीचे ट्रेनिंग दिले जात होते. पण समस्या अशी होती की कॅम्पमध्ये रायफलचे प्रशिक्षण घेण्यासाठी रायफलच नव्हती.

त्यामुळे ट्रेनिंग करण्यासाठी आलेले सगळे विद्यार्थी नाराज झाले होते. पण त्यातीलच एक विद्यार्थी आशिष विश्वकर्मा याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा परत आणला. कारण आशिषने लाकडापासून रायफल बनवली.

ही रायफल तयार केल्यानंतर कॅम्पमधील अधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आली आहे. ही रायफल एके- ४७ प्रमाणे आहे. एवढंच काय त्या रायफलला लेन्ससुद्धा बसवली आहे. त्याच्या या कामगिरीनंतर अधिकाऱ्यांनी त्याला सन्मानित केलं आहे.

आशिष कुमार हा सागर येथील रहिवासी आहे. आशिष कुमार विश्वकर्मा हा सुतार काम म्हणजे कारपेंटर ट्रेंडचा विद्यार्थी होता. दोन रायफल तयार करण्यासाठी त्याला २ दिवस लागले. यासाठी त्याला फक्त १०० रूपये खर्च आला आहे.

यात ६० रूपयांचे लेन्स होते आणि ते लेन्स रंगवण्यासाठी त्याला ४० रूपये खर्च आला. गन बॅरल्ससाठी लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला आहे. सगळीकडून आशिषचे कौतुक होत आहे. अशी रायफल तयार करणे सोपी गोष्ट नाही.

त्याने खुप कमी किंमतीत ही रायफल तयार केली आहे आणि हे जवळपास अशक्य आहे. त्याने भंगारातल्या वस्तु वापरून व कमीत कमी साधनांचा वापर करून ही रायफल तयार केली आहे.

आपल्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात ज्यामुळे आपले आयुष्य बदलून जाते. असाच प्रसंग आशिषबरोबर घडला आहे. सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.