१६ वर्षाच्या मुलाची ही आयडिया ठरणार गेम चेंजर, कमवू शकतो लाखो रूपये

0

 

 

असे म्हणतात एखादा व्यवसाय करायचा असेल , तर त्यासाठी तुमच्याकडे भन्नाट कल्पना असावी लागते, तरच तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. आजची गोष्ट अशाच एका १६ वर्षाच्या मुलाच्या आहे, ज्याच्या कल्पनेमुळे लवकरच तो लाखोंची कमाई करणार आहे.

दुबईमध्ये राहणाऱ्या एका भारतीय मुलाला शाळेचा एक प्रोजेक्ट करताना व्यवसायाची कल्पना सुचली आणि त्याने त्या प्रॉजेक्टलाच व्यवसायाचे स्वरुप दिले आहे. १६ वर्षाच्या या मुलाचे नाव इशिर वाधवा असे आहे.

इशिरने एक अशी टेक्नॉलाजीचा शोध लावला आहे, ज्याच्या साहय्याने भिंतीवर होल न पाडता अवजड वस्तुही लटकवता येणार आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला भिंतीवर बऱ्याचवेळा एखादी गोष्ट लटकवायची असेल तर भिंतीमध्ये होल पाडावे लागते, त्यामुळे त्याने भिंतीचे सुद्धा नुकसान होते पण आता इशिरने शोधलेल्या उपायामुळे आता भिंचीचे होणारे नुकसान टाळता येणार आहे.

झाले असे की इशिर वाधवाला शाळेत एक प्रोडेक्ट सबमिट करायचा होता. त्याला असा उपाय शोधायचा होता की भिंतीमध्ये होल न करता एखादी वस्तु लटकवता येईल का?

या प्रोजेक्टसाठी त्याने मोठ्या भावाची मदत घेतली. त्याचा भाऊ अविक अमेरिकेत इंजिनियरिंचे शिक्षण घेत आहे, त्यामुळे इशिरने त्याच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या चर्चेतून त्यांना ही आयडिया सुचली.

या दोघांची आयडिया अशी होती की एक चुंबक आणि दोन स्टीलच्या प्लेट एकसोबत जोडून ठेवायच्या. स्टीलची एक पट्टी भिंतीला चिपकून असेल त्याला त्यांनी अल्फा टेप असे नाव दिले आहे. न्यूयोडीम चुंबक दोन्ही पट्टांना जोडून ठेवते, त्यामुळे कोणतीही वस्तु तिथे लटकवता येऊ शकते. हा प्रयोग करताना दोन चुंबक एकावर एक आल्याने क्लिपचा आवाज आला म्हणून कुटूंबाने त्याला क्लॅपीट नाव दिले आहे.

इशिरने केलेल्या या प्रयोगाचे रुपांतर आता त्याच्या कुटुंबाने व्यवसायात केले आहे. यासाठी त्याच्या वडिलांनी आता नोकरी सोडली असून ते इशिरला हा व्यवसाय करण्यात मदत करणार आहे. या व्यवसायातून लाखोंची कमाई होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.