बडीशेपची शेती करुन ‘हा’ पठ्ठ्या करतोय लाखोंची कमाई; वाचा कशी करता येईल ही शेती

0

 

भारतात मोठ्या प्रमाणात पारंपारिक शेती केली जाते. पण असे म्हणतात शेतीत चांगले उत्पन्न मिळावायचे असेल तर डोकं लावल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे काही शेतकरी शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला दिसत असतात आणि त्यातुन ते तगडी कमाई करत असतात.

आजची गोष्ट अशा एका शेतकऱ्याची आहे, ज्याने पारंपारिक शेतीपेक्षा वेगळी शेती केली आहे, त्यातुन तो वर्षाला २५ लाख रुपये कमवत आहे. बारावी झालेल्या या शेतकऱ्याचे नाव इशाक अली असून त्याने बडीशेपची शेती केली आहे.

राजस्थानमध्ये राहणाऱ्या इशाक अली यांना बडीशेप किंग म्हणूनही ओळखले जाते. इशाक हे मूळचे गुजरातचे होते पण १२ वी झाल्यानंतर ते राजस्थानमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी शेती सुरु केली.

इशाक यांची सिरोही जिल्ह्यात वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी तिच शेती करण्यास सुरुवात केली, पण पारंपारिक शेती करुन त्यांना फारसा फायदा झाला नाही, त्यामुळे त्यांनी शेतीत एक वेगळा प्रयोग करुन पाहिला.

इशाक यांनी २००४ मध्ये बडीशेपची शेती सुरु केली, यातून त्यांना चांगलेच उत्पन्न मिळू लागले. सध्या ते १५ एकरवर बडीशेपची शेती करत असून त्यातून ते २५ टनपेक्षा जास्त बडीशेपचे उत्पन्न घेत आहे. या शेतीतून ते वर्षाला २५ लाख रुपयांची कमाई करत आहे.

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे त्यांना १२ वीनंतर शिक्षण घेणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली होती. सिरोही भागात बडीशेपची शेती चांगली होत असल्याने त्यांनी नव्या पद्धतीने हे पीक लावण्याचा निर्णय घेतला.

२००७ पर्यंत ते काही प्रमाणात पारंपारिक शेती करत होते, पण त्यानंतर त्यांनी पारंपारिक शेती पुर्णपणे बंद केली आणि पुर्ण जागेवर बडीशेपच्या शेतीची सुरुवात केली. या शेतीसोबतच त्यांनी एक नर्सरीदेखील सुरु केली आहे.

त्यांनी बडीशेपचे खास वाण तयार केले आहे, ज्याला आबु सौंफ ४४० असे म्हणतात. इशाक यांनी तयार केलेला हा प्रकार गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात पेरला जातो.

इशाक यांनी उत्पादन चांगले मिळावे यासाठीही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी बडीशेपची लागवड करताना दोन झाडे आणि दोन बेडमध्ये जास्त अंतर ठेवले. २ ते ३ फुटांचे अंतर त्यांनी जवळपास ७ फुटांचे केले.

त्यामुळे झाडांसाठी लागणाऱ्या सिंचनाची गरज कमी झाली. बडीशेमध्ये बरेच रोग हे ओलावा आणि जास्त पाण्यामुळे होतात. पण दोन झाडांमधील अंतर वाढल्याने झाडांना सुर्यप्रकाश मिळू लागला आणि त्यामुळे या शेतीतून त्यांना दुप्पट उत्पन्न मिळू लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.