अभ्यासात हुशार नव्हता म्हणून शाळेने हाकलून लावले, आज आहे क्रिकेटचा सुपरस्टार

0

सध्या जगात क्रमवारीत एक नंबरला असणाऱ्या इंग्लंड आणि जगात दोन नंबरला असणाऱ्या भारतीय संघात टी-२० ची मालिका सुरू आहे. या मालिकेत सध्या भारताने इंग्लंडची बराबरी केली आहे. या मालिकेत पहिल्यांदाच भारताला पराभवाचा धक्का बसला होता.

यानंतर भारताने दुसरा सामना जिंकला पण पुन्हा तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर भारताने पुन्हा चौथा सामना जिंकला आणि बरोबरी केली. दुसऱ्या टी-२० मध्ये दोन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली होती.

त्यामध्ये दोघांनीही चमकदार कामगिरी करत संधीचे सोने केले. आपल्या पहिल्याच सामन्यात ईशान किशनने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्याने ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी केली होती आणि त्याला करिअरच्या पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला.

पहिल्याच सामन्यात त्याने दाखवून दिले की आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मी तयार आहे. रातोरात ईशान किशन भारतीयांसाठी स्टार बनला आहे. पण तुम्हाला माहिती का? या हिरोला ऐकेकाळी अभ्यासात हुशार नसल्यामुळे शाळेतून काढण्यात आले होते.

त्याच्या इथपर्यंतचा प्रवास खुप संघर्षमयी आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत. ईशानचा जन्म १८ जुलै १९९८ साली बिहारच्या पाटना येथे झाला होता. वडील प्रणव पांडे आणि आई सुचित्रा सिंह हे एक मध्यमवर्गीय कुटुंब होते.

त्याचे वडिल रीअल इस्टेटच्या व्यवसायात आहेत. ईशानला एक भाऊदेखील आहे ज्याचे नाव राज किशन आहे. ईशानला घडवण्यात त्याच्या भावाचाही खुप मोठा हात आहे. ईशानच्या कुटुंबातील कोणीही क्रिकेटमध्ये नव्हते पण त्याला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती.

त्याची क्षमता वडिलांनी ओळखली आणि त्याला क्रिकेटचे धडे दिले. नंतर तो क्रिकेट क्लबमध्ये गेला आणि तेथून त्याच्या करिअरला सुरूवात झाली. त्याच्या क्लबमधील कोच संतोष कुमार यांनीही त्याच्यातील क्षमता ओळखली.

त्यावेळी सांगितले होते की ईशान हा धोनी आणि गिलख्रिस्टच्या लेवलचा खेळाडू आहे. ईशानच्या यशात कोच संतोष कुमार यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यावेळी बिहार क्रिकेट असोसिएशनची मान्यता बीसीसीआयने रद्द केली होती.

त्यामुळे संतोष यांनी ईशानला दुसऱ्या राज्यात क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ईशान रांची येथे आला. तिथे ईशानची निवड झारखंडच्या रणजी करंडकात झाली. सर्वात आधी ईशान तेव्हा चर्चेत आला जेव्हा त्याने रणजी सामन्यात दिल्लीविरूद्ध २७३ धावांची खेळी केली होती.

पुढे त्याला प्रदर्शनाच्या जोरावर अंडर १९ च्या संघात संधी मिळाली. तिथे देखील त्याने धडाकेबाज कामगिरी बजावली. २० व्या वर्षी त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. आयपीएलमध्येही त्याने जबरदस्त फॉर्म दाखवला.

त्याचेच फळ त्याला मिळाले आणि त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. २०१८ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने ६.२ कोटींना खरेदी केले होते. शाळेत असताना ईशान पुस्तकांवर क्रिकेटची चित्रे काढत बसायचा.

सातव्या वर्षी त्याने शाळेतील क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. आणि याच ईशानने नंतर अंडर १९ भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या जोरावर भारतीय संघ फायनलमध्येही पोहोचला होता.

ईशानला गाडी चालवायचा खुप शौक आहे. त्यासाठी त्याने एकदा जेलची हवादेखील खाल्ली आहे. याशिवाय त्याने पाटण्यात रिजर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कामदेखील केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.