भारतातच नाही हॉलिवूडमध्येही आहे इरफानचे चाहते; हॉलिवूडचा ‘हल्क’ देखील म्हणतो…

0

इरफान खान यांचे यावर्षी आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे याचा फिल्म इंडस्ट्रीसोबतच इराफानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. इरफान जरी आता या जगात नसले तरी ते नेहमीच आपल्या चाहत्यांच्या हृदयात असणार आहे.

इरफान खान यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्यांनी हॉलिवूड चित्रपटात देखील काम केले  होते, त्यामुळे त्यांचे चाहते फक्त भारतच नाही तर परदेशातही होते, इतकेच नाही तर काही हॉलिवूड सेलिब्रिटीही इरफान यांचे फॅन आहे.

असाच एक किस्सा इरफान यांच्या आयुष्यातला समोर आला आहे. असीम छाबडा यांनी इरफान यांची बायोग्राफी ‘इरफान: द मॅन, द ड्रीमर, द स्टार’ लिहली आहे. त्यात हा किस्सा त्यांनी लिहला आहे.

‘स्लम डॉग मिलियनेर’च्या यशानंतर इरफान चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य भट्टाचार्य आणि निर्माता लेजि होलेरन यांच्यासोबत न्यू यॉर्कच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी आपल्या टेबलच्या पुढच्या टेबलावर हॉलिवूड अभिनेते मार्क रूफालो यांना पाहिले, मार्क तेच आहे जे ‘द अवेंजर्स’मध्ये ‘हल्क’ची भूमिका साकारतात.

तेव्हा इरफान यांनी आदित्य यांना इशारा करत आपल्या समोरच्या टेबलावर मार्क बसले आहेत, असे सांगितले. तेव्हा मार्क हे काही लोकांसोबत बसलेले होते. तेव्हा इरफान यांनी आदित्य यांना सांगितले की, मी मार्कचा खूप मोठे फॅन आहेत, त्यामुळे मला त्यांना एकदा भेटायची इच्छा आहे.

मात्र तेव्हा तिथे इरफान यांना मार्कला भेटता आले नाही, त्यामुळे इरफान खूप निराश होते. जेव्हा ते रेस्टॉरंटच्या बाहेर निघायला लागले तेव्हा अचानक मार्क इराफानच्या समोर आले आणि असे म्हणाले, इरफान, तुमचे काम मला खूप आवडले.

तेव्हा मार्क हे इरफान यांच्याशी काही वेळ बोलले. तेव्हा मार्क यांनी इरफान यांच्या ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाचे खूप कौतुक केले. तसेच मार्क यांनी इरफान यांच्या अभिनयाचे देखील कौतुक केले.

त्यामुळे इरफान हे त्यांचे भूमिकेत किती खोलवर जायचे याचा अंदाज येतो. त्यांचे अभिनयाचे हॉलिवूड सेलेब्रिटीदेखील फॅन होते, मार्क यांच्या आधी प्रसिद्ध अभिनेता टॉम हैंक्स यांनी देखील इरफान यांच्या अभिनयाचे कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.