केरळच्या ‘या’ माणसाने ५० वर्षात खोदल्यात १००० पेक्षा जास्त गुफा; एकदा वाचाच…

0

डोंगर फोडून रस्ता तयार करणाऱ्या माऊंटेन मॅन दशरथ मांझी यांच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता केरळच्या एका ‘दशरथ मांझी’ची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या नवीन माऊंटेन मॅनने आपल्या आयुष्यात १ हजारपेक्षा जास्त गुफा खोदल्या आहेत.

केरळच्या या नव्या माउंटन मॅनचे नाव कुंजंबु असे आहे. त्यांचे वय ६७ वर्षाचे असून ते गेले ५० वर्षांपासून खोदकाम करत आहे. त्यांनी गावासाठी आतापर्यंत १००० गुफा बनवल्या असून आता पूर्ण गावाला कोणत्याही बोरिंगची गरज पडत नाही.

केरळच्या कासडगोड गावात राहणाऱ्या कुंजंबु यांनी वयाच्या १४ व्या वर्षीच खोदकाम सुरू केले होते. कुंजंबु हे पाण्याच्या गुफा खोदण्यात माहीर आहे. देशात खूप कमी लोक असे आहेत, जे पाण्याच्या गुफा खोदू शकतात.

ही गुफा डोंगरात खोदून बनवली जाते. गुफा २.५ फूट उंच आणि आत जवळपास ३०० किलोमीटर लांब असते. जो पर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत हा गुफा खोदली जाते. तिथल्या क्षेत्रात बोरिंगपेक्षा जास्त या गुंफांनी पाणी प्रश्न सोडवले जातात.

गुफा खोदल्यानंतर त्याच्या बाजूला एक मोठे जलाशय बनवले जाते. ज्यामुळे गुफेतुन येणारे पाणी त्या जलाशयात जाईल आणि लोकांना ते वापरता येईल. या गुफेला वॉटर हार्वेस्टिंगचा उत्तम पर्याय मानला जातो.

३०० मीटर लांब असणारी गुफा खोदण्यासाठी खूप ताकदची गरज पडते. अनेकदा गुफा जास्त लांब गेल्यानंतर ऑक्सिजनचे प्रमाण पण कमी असते, तेव्हा आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते.

अनेकदा ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यानंतर श्वास घेण्यास अडचण येते. त्यामुळे कुंजंबु नेहमीच आपल्या सोबत एक माचीस आणि मेणबत्ती ठेवत असतात. ते सतत माचीसची काडी पेटवून बघत असतात, जर काडील आग लागली नाही तर तिथे ऑक्सिजन कमी असते, त्यामुळे तिथून ते बाहेर निघून येतात.

पाण्याची गुफा ही शेतकऱ्यांना बोरवेलपेक्षा जास्त उपयोगी आहे. या गुफेमुळे पाण्याचे वर्ष भराची चिंता मिटते. त्यामुळे बोरवेल पेक्षा ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी जास्त उपयुक्त आहे. अशात कासरगोड भागात बोरवेलचे पाणी लवकर संपते, त्यामुळे या क्षेत्रात पाण्याची गुफाच फायदेशीर ठरते, असे कुंजंबु यांनी म्हटले आहे.

आज कासरगोड जिल्ह्यात ५ हजारांपेक्षा जास्त पाण्याच्या गुफा आहेत. मात्र लोकप्रियतेमुळे या गुंफांची संख्या आता कमी होत चालली आहे, परंतु ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याने या प्रणालीला पुन्हा जिवंत करायचे आहे, असे कुंजंबु यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.