आजी-नातीच्या जोडीने सुरु केला व्यवसाय, आत महिन्याला करताय ४ लाखांची कमाई

0

 

प्रत्येक माणसाला काहीना काही छंद असतो. अनेकदा लोकांना वेगगवेगळ्या गोष्टींचा छंद असल्यामुळे ती गोष्ट घेण्यात लोक पैसे घालवतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका आजींची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी आपल्या छंदाला व्यवसायाचे स्वरुप दिले असून त्या आजी त्यातून लाखोंची कमाई करत आहे.

कोलकतामध्ये राहणाऱ्या या आजींचे नाव मंजू देवी पोद्दार असे आहे. ६५ वर्षाच्या आजी या खुप स्वादिष्ट मिठाई बनवतात. त्यांच्या या छंदाला त्यांनी आता आपल्या २१ वर्षाच्या नातीसोबत मिळून व्यवसायाचे स्वरुप दिले आहे, त्यामुळे आता त्या या व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहे

आज त्यांची ही मिठाई अमेरिका आणि हाँगकाँगसारख्या देशात पोहचली आहे. मंजू या खुप वर्षांपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात, कुकींग करणे हा त्यांचा छंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

१५ वर्षाच्या वयातच मंजू यांचे लग्न झाले होते, त्याच्याआधी त्यांनी कधीच स्वयंपाक तयार केला नव्हता, मंजू देवींना त्यांच्या सासूने स्वयंपाक करण्यास शिकवले. दोन-तीन वर्षातच ते वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यात माहिर झाल्या.

मंजू यांची नात याशी ही नेहमीच आजींकडे राहायला यायची. तेव्हा तिला वेगवेगळे पदार्थ खायला मिळायचे. गेल्यावर्षी सुद्धा ती लॉकडाऊनमध्ये राहण्यासाठी आली होती. तेव्हाच तिला आजीसोबत मिळून व्यवसाय करण्याची आयडिला सुचली.

याशीने आणि आजींनी मिळून नानीज स्पेशल असे नाव व्यवसायाला दिले आणि एक त्याचा लोगो बनवला. तिने ऑर्डर मिळवण्यासाठी नानीज स्पेशलचे काही मॅसेज लिहिले आणि ते मॅसेज व्हॉट्सऍपला फॉरवर्ड केले.

जन्माष्टमी असल्याने त्यांना सुरुवातीला ४० ऑर्डर्स मिळाल्या. त्यांनी आपल्या मिठाईमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या बनवल्या आहे, त्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई त्यांनी तयार केल्या. परवल, पेडा, नारळाची चिक्की, अजवाईन चिक्की, अशा मिठाई तयार केल्या. त्यांना खुप चांगला प्रतिसाद मिळाला आणि दिवसेंदिवस त्यांना ऑर्डर्स मिळत गेल्या.

या व्यवसायाला फक्त ८ महिनेच झाले असले तरी आज ते महिन्याला ४ लाख रुपयांची कमाई करत आहे. आज त्यांची मिठाई फक्त कोलकत्यातच नाही, तर विदेशात सुद्धा विकली जात आहे. विशेष म्हणजे मंजू आणि त्यांच्या नातीने हा व्यवसाय घरी बसूनच सुरु केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.