पती गेल्यानंतर दोन मुलांची जबाबदारी आली एकटीच्या अंगावर, ट्रक चालवून सांभाळतेय मुलं

0

 

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. पण अजूनही काही क्षेत्र आहे, जिथे आपल्याला महिला दिसून येत नाही ते क्षेत्र म्हणजे ड्रायव्हिंग, पण काम कितीही अवजड असो एखाद्या महिलेने ठरवले तर ती काहीही करु शकते, आता पुन्हा एकदा एका महिलेने सिद्ध करुन दिले आहे.

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव योगिता रघूवंशी आहे. हायवेवर ट्रक चालवणे खुप कठिण काम आहे, कारण त्यांना तासनतास ट्रक चालवावी लागते आणि आराम तर भेटतच नाही, पण योगिता रघूवंशी या गेल्या १५ वर्षांपासून हायवेवर ट्रक चालवत आहे.

योगिता एक सिंगल मदर आहे, त्यांना दोन मुले आहे. कुटुंबाला सांभाळण्यासाठी योगिता गेल्या १७ वर्षांपासून ट्रक चालवत आहे. या ट्रकमुळे त्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आल्या आहेत.

योगिता या ४९ वर्षांच्या आहे. योगिता यांना त्यांच्या आयुष्यात खुप अडचणी आल्या पण त्या प्रत्येक संकाटाला मात देऊन पुढे जात आहे. ट्रक चालवातांनाही त्यांना खुप अडचणी येत असतात, कारण हायवेवर ट्रक चालवतांना त्यांना नेहमीच सावध राहावे लागते.

ड्रायव्हिंगमुळे त्या देशभर फिरल्या असून या कामातून मिळणाऱ्या पैशातूनच योगिता आपले कुटुंब चालवतात. त्यांना या प्रवासामुळे मराठी, हिंदी. इंग्लिश, गुजराती, तेलुगू, भाषेचेसुद्धा ज्ञान आले असून त्या पाच भाषांमध्ये बोलू शकतात.

योगिता यांच्याकडे लॉची आणि कॉमर्सची डिग्री आहे. तसेच त्यांच्याकडे ब्युटीशियनचे सर्टीफिकेट सुद्धा आहे. पण मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी योगिता यांनी ट्रक चालवण्याचा निर्णय घेतला.

२००३ मध्ये जेव्हा योगिता यांच्या पतीचे निधन झाले, तेव्हापासून त्यांनी ट्रक चालवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांच्याकडे ३ ट्रक होत्या. तेव्हा पतीचे निधन झाल्याने तिने एका ड्रायव्हर ठेवले पण तो ड्रायव्हर ६ महिन्यातच पळून गेला, त्यानंतर तिने स्वत: ट्रक चालवण्यास सुरुवात केली.

भारताच्या रस्त्यांवर ट्रक चालवणे सोपे काम नाहीये, अशात योगिता या आपल्या परिस्थितीमुळे ट्रक चालवत पुर्ण देशभरात काम करत आहे. योगिता यांचा हा संघर्ष हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.