जिद्दीला सलाम! वडिलांचा अपमान सहन झाला नाही; गोठ्यात शेण उचलण्याचे काम करून झाली न्यायाधीश

0

 

 

प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात, पण जर माणूस जिद्दीने आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर एक दिवस त्याला यश नक्कीच मिळते. आजची ही गोष्ट पण अशाच एका तरुणीची आहे.

एकेकाळी म्हशीच्या गोठ्यात शेण उचलण्याचे काम करणारी ही तरुणी आता न्यायाधीश झाली आहे. आरजेएस परीक्षा पास करून तिने फक्त तिचेच नाही तर घरच्यांचे नाव पण मोठे केले आहे.

या तरुणीचे नाव सोनल शर्मा असे आहे. ती राजस्थानच्या उदयपूरमधल्या प्रतापनगर परिसरात राहते. सोनल आपल्या वडिलांच्या कामात मदत करण्यासाठी म्हशीच्या गोठ्यात काम करते.

तिने लहानपणापासूनच गोठ्यात शेण उचलण्याचे, म्हशींचे दूध काढून ते विकायचे, गोठ्याची साफसफाई करण्याचे काम सुरू केले होते. हे सगळे काम तिच्या आयुष्यातले रोजचे काम होते.

तिच्या वडिलांना अनेक लोकांनी नावे ठेवली होती. गल्लीतला कचरा उचलताना सुद्धा तिने वडिलांना पाहिले होते. त्यामुळे तिला आपली परिस्थिती बदलायची होती,  त्यामुळे तिला काहीतरी वेगळे करायचे होते.

सोनल लहानपणापासून शिक्षणात हुशार होती. ती नेहमीच पहिली यायची. सोनलने जेव्हा एलएलबीला प्रवेश घेतला, तेव्हा तिथे येणाऱ्या न्यायधीशांना पाहून तिनेही न्यायाधीश बनण्याचा निर्णय घेतला.

तिची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिला कोचिंग लावता आली नाही. पण ती आपल्या जिद्दीवर कायम होती. तिने खूप मेहनत घेतली, अभ्यास केला आणि शेवटी न्यायाधीश बनून दाखवले.

Leave A Reply

Your email address will not be published.