सलाम! अंध मुलामुलींना शिकवले मल्लखांब, आता मुलांनी मारली डान्स इंडिया डान्सपर्यंत मजल

0

 

कोणाचे स्वप्न काय असेल हे सांगता येत नाही, काही लोकांचे स्वप्न हे फक्त स्वत: पुरतेच असते, पण आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशा एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, त्याचे काम बघून तुम्हालाही त्याचे कौतूल करावेसे वाटेल.

पुण्यात राहणाऱ्या या तरुणाचे नाव श्रीनिवास हवालदार असे आहे. तो एक मल्लखांबपटू असून त्याने आपली ही कला फक्त स्वत: पुरती मर्यादीत ठेवली नाही, तर त्याने मल्लखांबचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे तो अंध मुला-मुलींना मल्लखांबचे प्रशिक्षण देत आहे.

श्रीनिवासने लहानपणापासूनच मल्लखांब खेळण्यास सुरुवात केली होती, जेव्हा तो ८ वर्षांचा होता तेव्हा त्याने टिळक रस्त्यावरच्या महाराष्ट्र मंडळात मल्लखांबला सुरुवात केली होती. त्याने आपला खेळ राष्ट्रीय पातळीवर सुद्धा नेला. पण फक्त आपलेच स्वप्न पुर्ण व्हावे या विचारांचा तो नव्हता. त्यामुळे त्यांनी अंध मुला-मुलींना मल्लखांब शिकवण्यास सुरुवात केली.

२०११ मध्ये तो कोरेगावच्या अंध शाळेत गेला. तिथे त्याने बघितले की शाळेत मल्लखांब तर हा आहे, पण तिथे त्या मुलांना शिकवण्यासाठी कोणी शिक्षक नाही. त्याने तिथल्या शिक्षकांची परवानगी घेतली आणि विद्यार्थ्यांना मल्लखांब शिकवण्यास सुरुवात केली.

कोणीही मल्लखांब बघितलेला नव्हता, त्यामुळे श्रीनिवास यांनी मुलांना बेसिक गोष्टीपासून शिकवण्यास सुरुवात केली. या मुलांना शिकवणे जरा कठिण होते, त्यामुळे एक एक विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देत श्रीनिवास मुलांना शिकवू लागला.

आता मात्र दहा वर्षात ही सर्व मुले मुली मल्लखांबामध्ये चांगलीच माहिर झाली आहे. ते फक्त आता मल्लखांबच खेळत नाही, तर ही मुले आता गणपतीच्या मिरवणूकीतही आपले कौशल्य दाखवतात. तसेच ते डान्स इंडिया डान्स सारख्या कार्यक्रमात देखील गेली आहे.

श्रीनिवासने या मुलांना लवकरात लवकर शिकता यावे यासाठी ऑडियो बुकची निर्मिती सुद्धा केली आहे. या ससर्व कामाची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.