आधी मॅगी खाऊन दिवस काढले, आता खेळात करियर करणाऱ्या मुलींना देतेय महिन्याला १० हजार रुपये

0

 

 

आज अनेक खेळाडू आहेत, जे आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करत आहे. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा खेळाडूची गोष्ट सांगणार आहोत, ज्या तरुणीने २०१६ मध्ये खोखोचे भारतीय संघाचे दक्षिण एशियाई खेळामध्ये नेतृत्व करत सुवर्णपदक मिळवले होते.

या तरुणीचे नाव आहे सारिका काळे. सारिकाला २०२० मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, सध्या ती उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर खेळ अधिकारी पदावर कार्यरत आहे. पण तिचा इथपर्यंतचा संघर्ष खुप कठिण होता.

एककाळ असा होता की तिला जेवणे मिळणेही कठिण होते. त्यामुळे ती फक्त एकवेळची मॅगी खाऊन खोखोचा सराव करायची. पण आता ती ज्या मुलींना खेळात करियर करायचे आहे, त्या मुलींना महिन्याला दहा हजार रुपये देत आहे.

सारिकाचे काका महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या खोखो टीमकडून खेळायचे. तेव्हा सारिका फक्त १३ वर्षाची होती. तेव्हाच तिच्या काकांनी तिला खोखोच्या मैदानात उतरवले. तेव्हापासून तिने खोखो खेळणे सुरुच ठेवले.

त्यावेळी तिला परिस्थितीमुळे दिवसातून एक वेळेच जेवायला मिळायचे. तिला तेव्हा चांगले आणि पोटभर जेवण मिळायचे, जेव्हा ती एका कॅम्पममध्ये जायची किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायची.

एकवेळ तरी अशी आली होती की तिला कुटुंबातल्या आर्थिक अडचणींमुळे तिला खोखो सोडण्याची वेळ आला होती. पण तिचे कोच चंद्रजीत जाधव यांनी पुन्हा तिला मैदानात खेळण्यासाठी आणले.

दोन वर्षांपुर्वी तिला सरकारी नोकरी मिळाल्याने तिची आणि तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, तिच्यासारखी वेळ आता दुसऱ्या मुलींवर येऊ नये यासाठी आता ती खेळात करीयर करणाऱ्या मुलींना दरमहिना दहा हजार रुपये देत आहे.

परिस्थिती कशीही असो आपण जर आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेऊन सातत्याने मेहनत घेत राहिली, तर लवकरच वेळ बदलते, हे सारीका सिद्ध करुन दाखवले आहे. सारिका आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.