‘या’ परिचारिकेने एकाच वेळी ५ बालकांना हातात घेऊन, आगीतून धाव घेत वाचवले होते त्यांचे जीव

0

भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत १० नवजात शिशुंचा जीव गेला आहे.

घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा नागपूरमधील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका सविता इखार यांची अनेकांनी आठवण काढली आहे.

परिचारिका सविता यांनी २०१९ मध्ये रुग्णालयात लागलेल्या आगीतुन तब्बल ९ बाळांचा जीव वाचवला होता. त्यामुळे आज भंडाऱ्यातील आगीमुळे पुन्हा एकदा सविता यांची आठवण काढली जात आहे.

२०१९ मध्ये रुग्णलायात लागलेल्या आगीत नेमकं काय घडलं होतं?

३१ ऑगस्ट २०१९ मध्ये इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयामधील एनआयसीयूला आग लागली होती. ती आग पहाटे पावणे तीनला लागलेली होती. त्यावेळी रात्रीपाळीला सविता इखार काम करत होत्या.

एनआयसीयूमध्ये काम करताना नवजात बालकांची काळजी घ्यावी लागत असते. बाळांना दर तीन तासांनी फिडिंग करावे लागते. त्यामुळे त्या कॉरिडॉरमध्ये आल्या होत्या. तिथे एनआयसीयूच्या गेटाजवळ डीपी होती. त्या डीपीत स्पार्किंग होत होती.

स्पार्किंग सविता यांनी बघितले. त्यांना वाटले की स्पार्किंग थोड्या वेळाने बंद होईल. पण तसे काही झाले नाही थोड्यावेळात आगीने थेट रौद्ररूप धारण केले. तिथेच खाली ऑक्सिजनचे सिलिंडर ठेवलेले होते. तेव्हा काही रुग्णांना ऑक्सिजन लागलेले होते, त्यामुळे आग वाढण्याची जास्त भीती होती.

हे पाहून सरिता यांनी तात्काळ सरिता यांनी बाहेर धाव घेतली. तेव्हा पहाटेची वेळ असल्याने तिथेच कोणीच नव्हते. त्याचवेळी दुसऱ्या वार्डाची एक परिचारिका आली, तिला आग लागल्याचे सांगून सारिताने तातडीने एनआयसीयूकडे धाव घेतली.

तिथे असलेली सर्व ऑक्सिजन सिलेंडर तिने बंद केली. लगेच तिथल्या सर्व खिडक्या उघडल्या आणि तिने लगेच आपल्या हातावर चार बाळांना घेऊन वार्डाच्या बाहेर धाव घेतली. त्यासर्व बाळांना त्यांनी दुसऱ्या वार्डात नेऊन ठेवले.

त्या पून्हा एकदा आपल्या वार्डात गेल्या आणि त्यावेळी त्यांनी पाच नवजात बालकांना एकाच वेळी उचलले आणि दुसऱ्या वार्डात ठेवले. त्यापैकी एक बाळ गंभीर होते, त्यामुळे त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यांनी लगेच ऑक्सिजन मागवले आणि त्या बाळाला लावले.

अशाप्रकारे सविता इखार यांनी एकाच वेळी नऊ बालकांचा जीव वाचवला होता. त्यामुळे अनेकांनी भंडार जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेनंतर शूर परिचारिका सविता इखार यांची आठवण काढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.