पप्पांनी गळफास घेतला, मम्मी धुनीभांडी करते, साताऱ्यातील भाजी विकणाऱ्या मुलीची निशब्द करणारी गोष्ट

0

पुरुष नेहमीच संसाराचा गाडा ओढण्यासाठी आपले कुटुंब सांभाळण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण जर कर्त्या पुरुषाचे अचानक निधन झाले तरी कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्याचा विचार करणेही आपल्याला जड जाईल.

अशात गुरुवारी मनसेच्या फेसबुक पेजरून अंतःकरण जड करणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गुरुवारी सर्वजण नववर्षाचे सेलिब्रेशन करत असताना सातारा जिल्ह्यातील एक नऊ वर्षांची मुलगी मेथीची भाजी विकताना दिसून आली आहे.

या मुलीचे नाव रिद्धी आहे. ती सातारा जिल्ह्यातील वाई गावात राहते. चौथीत शिकणाऱ्या रिद्धीवर आपल्या घरच्या परिस्थितीमुळे मेथीची भाजी विकण्याची वेळ आली आहे. व्हिडीओमध्ये रिद्धीसोबत एक महिला संवाद साधताना दिसून येत आहे.

त्या महिलेने रिद्धीला अनेक प्रश्न विचारले आहे, पण आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे दुःख न दाखवता, तिने सर्व प्रश्नांची निरागसपणे उत्तर दिले आहे.

जेव्हा तिला विचारण्यात आले की, मम्मी पप्पा कुठे आहेत, तर तिने वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले आहे. पप्पांनी गळफास घेतला आहे आणि मम्मी दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी करते असे तिने म्हटले आहे.

आईला घर संसारात मदत करण्यासाठी मी मेथीची भाजी विकत आहे, असे तिने म्हटले आहे. तिचे हे शब्द अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरुवारी सर्वजण नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यात मग्न होते, पण त्याचवेळी एक बाप नसलेली चिमुरडी आपल्या आईला मदत व्हावी म्हणून भाजी विकत आहे. ही गोष्ट खरंच डोळे पाणवणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.