तुच रे भावा! अपघातात पाय गमावले तरी हिंमत न हारता रिक्षा चालवून सांभाळतोय कुटुंब

0

 

प्रत्येकाचे आयुष्य हे एका सरळ रेषेत नसते. आयुष्याच्या वाटेवर अनेक मोठ्या आव्हानांचा सामना तुम्हाला करावाच लागणार असतो. पण तुमच्याकडे जर त्या संकटांवर मात करण्याची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणत्याही संकटांचा सामना करु शकतात.

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात त्यामुळे खुप लोक नैराश्यात गेले तर काही लोकांनी आत्महत्या केल्या अशात पिंपरी-चिंचवमध्ये राहणारा नागेश काळे आर्थिक संकटात तग धरुन आहे.

विशेष म्हणजे नागेशने एका अपघातात दोन्ही पाय गमावले असले तरी तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्यामुळे नागेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आयुष्य खुप अनमोल आहे, त्यामुळे आर्थिक संकटांवर मात करा, आर्थिक संकटांना घाबरुन आत्महत्या करु नका, असे आवाहन नागेशने लोकांना केले आहे.

गेल्यावर्षी मार्चमध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले होते. त्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले होते, त्यामुळे काही लोक तर गावी परतले होते, तर काही लोकांनी आर्थिक संकट आल्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊलही उचलले.

अशात एका अपघातात दोन्ही पाय गमावलेला लॉकडाऊन काळातही आर्थिक संकटावर मात करत उंच भरारी घेताना दिसून येत आहे. नागेश रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

नागेश गेल्या दहा वर्षांपासून रिक्षा चालवत आहे. तो आपल्या पत्नी आणि आईसह भाडाच्या घरात राहतो. २०१३ मध्ये रेल्वेतून उतरत असताना त्याला कोणीतरी धक्का दिला. त्यामुळे त्याचे पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकले होते. त्या अपघातात त्याला दोन्ही पाय गमवावे लागले होते.

पाय गमवले असले तरी त्याने त्याच्या आयुष्यात कधीच हार नाही मानली. त्याने नेहमी आयुष्यात समाधानी कसे राहता येईल याकडे लक्ष दिले होते. त्याने तीन महिन्यातच पुन्हा रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.

कोरोनाच्या संकटात सगळ्यांनाच आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे, पण आयुष्य जगत असताना आत्महत्या करणे चुकीचे आहे, जन्म एखदाच मिळत असतो, त्यामुळे आत्महत्या करणे चुकीचे आहे, असे नागेशने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.