पाय नसताना ‘या’ पठ्ठ्याने असा विक्रम केलाय की तुम्ही पाय असताना सुद्धा करू नाही शकणार

0

 

अनेक लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर उंचच्या उंच अशी यशाची उंची गाठतात. तेव्हा तर इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काहीही करून जातो, जेव्हा आपल्या ध्येयाचा असेल.

आपले ध्येय गाठण्यासाठी तुमचं शरीर, तुमची आर्थिक स्थिती धडधाकट हवी असे अनेकांना वाटते. पण आजची गोष्ट आहे ती यांपेक्षा अपवाद आहे. आजची हि गोष्ट एका तरुणाची आहे.

या तरुणाचे नाव मोहंम्मद शम्स आलम आहे. या तरुणाने वयाच्या २४ व्या वर्षी आपले पाय गमावले. तरीही आज पॅरा स्विमर म्हणून त्याने जगभरात भारताचे नाव मोठे केले आहे. तसेच त्याने आपले नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील एका गरिब कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. मोहंम्मद लहाणपणापासुन ब्रुस लीचा फॅन होता. त्याला कराटे खेळायला खुप आवडत होते. २३ वर्षाचा असताना तो कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट झाला होता.

२०१० मध्ये त्याला चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे होते. पण तेव्हाच एक धक्कादायक घटना घडली. त्याच्या पाठीच्या कण्यात ट्युमर असल्याचे समजले.

तेव्हा त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शस्त्रक्रियेत त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी त्याला पॅरेलिसिसचा झटका आला. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना अपंगत्व आले.

आजारामुळे त्याला दोन वर्षे काहीच करता आले नाही. त्याने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या समस्यांवर मात करण्याचे ठरवले. तो बरा होऊ लागला आणि त्याने पोहायचे ठरवले.

तिथेही त्याने अतुलनीय कामगिरी केली. समुद्रात सर्वाधिक अंतर पोहून कापणारा तो जगातील सर्वोत्तम खेळाडू होता. मुंबईतल्या खुल्या समुद्रात ६ किलोमीटर अंतर त्याने १ तास ४० मिनिटांत कापले होते. त्यामुळे त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.

२०१७ मध्ये त्याने आपला हा विक्रम मोडत आठ किलोमीटरचे अंतर ४ तास ४ मिनिटांत पार केले. त्याने पुढे भारताचे प्रतिनिधित्व पॅरा एशियन गेम्समध्ये केले होते.

मोहंम्मदने पाटणा येथील पाटलीपुत्र स्पोर्टस कॉम्पलेक्समध्ये अपंगांसाठीही सोईसुविधा निर्माण केल्या. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावरच त्याने इतके यश मिळवले आहे. मोहंम्मदची ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.