वडील वारले, आईने आत्महत्या केली अन् आयुष्यात खचून न जाता तो बनला पोलीस अधिकारी

0

 

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात आई-वडिलांचे खूप महत्व असते. एखादा व्यक्ती त्यांच्याशिवाय जीवन जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही.

आई-वडील लहानपणीच गमवाले तर माणूस पुढे कसा घडेल हे सांगता येत नाही. पण काही व्यक्ती असे असतात जे अशा परिस्थितीत सुद्धा स्वतःला चांगले घडवतात.

आजची ही गोष्ट सुद्धा अशाच एका माणसाची आहे. ज्याने कमी वयात आपले आईवडील गमावले पण त्याने तो कधीच खचून गेला नाही आणि आज तो एक पोलीस अधिकारी आहे.

चेन्नईच्या अंबततुर पोलीस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याचे नाव मनिकंदन आहे. मनिकंदन लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. वडील गेल्याने कुटुंबाची आर्थिकस्थिती आणखीन बिघडली, त्यामुळे मनिकंदन यांच्या आईने त्यांना अनाथालयात पाठवले.

मनिकंदन ७ वीमध्ये शिकत असताना एकदा त्याची आई त्याला भेटायला आली. तेव्हा तो शाळेत गेला होता, तर ती शाळेत त्याला भेटली आणि घरी गेली. थोड्यावेळातच बातमी आली की त्यांच्या आईने स्वतःला जाळून आत्महत्या केली आहे.

मनिकंदन यांच्यासाठी ही परिस्थिती खूप वाईट होती की काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि लगेच आता आईचा. अशा परिस्थिती त्याने हार मानली नाही, पुन्हा एकदा आयुष्यात ध्येयाच्या दिशेने धावू लागला.

अनाथालयातल्या एका माणसाने मनिकंदन यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलेल अशा माणसाला शोधले. ते एक डॉक्टर होते, त्यांनी मनिकंदन यांच्या शिक्षणाचा पूर्ण करत उचलला.

मानिकंदन यांना लहानपणापासून पोलीस बनायचे होते. मानिकंदन यांनी खूप मेहनत घेऊन अभ्यास केला आणि २००७ मध्ये त्यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड झाली. मनिकंदन यांची ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.