या दोन मुलींचे जिद्द पाहून तुम्हीही व्हाल हैराण; फुकटात वाटत आहे सॅनिटरी पॅड

0

 

२०१८ मध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट आला होता. या चित्रपटात मासिक पाळीमध्ये महिलांच्या शारीरिक स्वच्छतेसारखा महत्वाचा विषय मांडण्यात आला आहे. चित्रपटातून प्रेरणा घेऊन चंदीगडच्या दोन मुलींनी एक मोहीम सुरू केली असून त्या महिलांना फ्रीमध्ये सॅनिटरी पॅड वाटतात.

जानवी सिंग (वय १५) आणि लावण्या जैन (वय १७) असे या दोन मुलींची नावे आहे. चित्रपटातुन प्रेरणा घेऊन जानवी आणि लावण्याने ‘स्पॉट फ्री’ नावाची एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत दोघी झोपडपट्टीतील महिलांना सॅनिटरी पॅड वाटतात.

तसेच झोपडपट्टीतील लोकांमध्ये सॅनिटरी पॅडबद्दल जनजागृतीचे कामेही दोन्ही मुली करत आहे. मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड न वापरल्याने होणाऱ्या दुष्परिणानामांची जनजागृतीही जानवी आणि लावण्या करत आहे.

पॅडमॅन चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला ही पॅड वाटण्याची संकल्पना सुचली. आज अनेक महिलांना पॅड घेण्यासाठी पैसे नाहीये त्यामुळे त्यांना मासिक पाळीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आम्ही पॅड बनवून त्यांना फ्रीमध्ये देतो, असे जानवी आणि लावण्याने म्हटले आहे.

तसेच जानवी आणि लावण्या या सॅनिटरी पॅडची पॅकिंग करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळतात. पॅकिंगसाठी त्या वर्तमानपत्रांचा वापर करतात. त्यांनी तयार केलेल्या पॅडची किंमत दोन रुपये आहे.

मासिक पाळीबद्दल समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहे. तसेच मासिक पाळी बद्दल अजूनही बोलले जात नाही. पण आम्ही मुली असल्याने आम्हाला माहितीये की मासिक पाळी आलेली असताना, आपल्या शरीराची काळजी घेणे किती गरजेची आहे, जर तुम्ही चांगला कपडा किंवा सॅनिटरी पॅड वापरत नसाल, तर अनेक आजार होऊ शकतात, असे जानवी आणि लावण्याने म्हटले आहे.

जानवी आणि लावण्या सॅनिटरी पॅड घरीच बनवत असतात. तसेच या कामात दोन्ही मुलींना घरच्यांचाही पाठिंबा आहे. या दोघींच्या कामात जानवीचा १४ वर्षांचा भाऊ त्रिनभ आणि ९ वर्षांचा सुमेर आणि रणवीर देखील मदत करत आहे.

९ फेब्रुवारी २०१८ मध्ये अक्षय कुमारचा पॅडमॅन चित्रपट आला होता. चित्रपटात मुख्यभूमिकेत अक्षय कुमारसोबत राधिका आपटे दिसून आली होती. या चित्रपटात मासिक पाळीसारखा महत्वाचा विषय मांडला आहे. या चित्रपटामुळे सॅनिटरी पॅडची मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.