१०० रुपयांत व्यवसाय सुरू करणारी महिला आज कमवतेय महिन्याला लाखो रुपये; वाचा संघर्षमय कहाणी

0

 

एखादा व्यक्तीने जर मेहनतीने खूप काही कमावले आणि एका झटक्यात ते सर्व गमावले तर त्या व्यक्तीची काय अवस्था होईल? याचा आपण विचार पण करू शकत नाही.

आजची ही गोष्ट अशा एका महिलेची आहे, जिने आपण कमावलेले सगळे गमावले, पण हार न मानता पुन्हा १०० रुपयांत व्यवसाय सुरू केला आहे. या महिलेचे नाव इलावारसी जयकांत असे आहे.

इलावारसी याचे वय ४५ वर्ष असून त्या केरळच्या थ्रीसुर शहरात राहतात. त्यांचे कुटुंबीय मिठाईचा व्यवसाय करत असून त्यांचे मिठाईचे दुकान होते.

इलावारसी यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न लावून देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांकडून मिठाईबाबत सगळी माहिती घेतली होती. त्यामुळे त्यांनी सुद्धा मिठाई बनवण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले.

मिठाई कशी बनवायची हे सुद्धा त्या आपल्या कुटुंबियांकडून शिकून आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी लगेच मिठाई बनवून मिठाईंची लोकल दुकानांमध्ये विक्री सुरू केली. त्यांना या व्यवसायात चांगला फायदा होऊ लागला होता.

पुढे त्यांनी आपल्या घरच्यांच्या सल्ल्यांनी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि २०१० मध्ये त्यांनी एक सुपरमार्केट स्टोअर उघडले.  त्या स्टोअरमध्ये ५० कर्मचारी कामाला ठेवले होते. अशात २०११ मध्ये त्यांच्या दुकानात चोरी झाली. या चोरीत त्यांनी सगळे काही गमावले.

पण इलावारसी हार मानणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय पून्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात फक्त १०० रुपयांनी केली होती. आज थ्रीसुरमध्ये याचे चार आउटलेट आहे.

आता त्यांच्या स्टोअरमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, लोणचं आणि विविध प्रकारचे केक सुद्धा तिथे मिळतात.

त्यांच्या मेहनातीमुळे त्यांना एवढे यश प्राप्त झाले असून त्या महिन्याला लाखोंची कमाई करत आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांना इंटरनॅशनल पीस कौन्सिल यूएइ अवॉर्ड ‘बेस्ट इंटरप्रिनर’ मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.