घरात पीठ नव्हते तर आई रडत होती, आता त्याच पोराने आईसाठी उभी केली ५५० कोटींची कंपनी

0

परिस्थिती कितीही गरीबीची असो आपल्या जिद्दीवर आणि आपल्या मेहतीवर अनेक लोकांनी तिला बदलून दाखवले आहे, त्यातलेच एक नाव म्हणजे अशोक खाडे.

एकवेळ होती जेव्हा त्यांच्या कुटुंबाला एकवेळचे जेवण मिळवण्यासाठी खुप संघर्ष करावा लागायचा, पण आता त्यात कुटुंबातले अशोक खाडे आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडपती बनले आहे. अशोक खाडे दासऑफ शोअर कंपनीचे मालक असून त्यांची वार्षिक उलाढाप ५५० कोटींची आहे. तसेच आता त्यांनी ४५०० मजूरांना रोजगार सुद्दा दिला आहे.

सांगलीच्या पेड गावात जन्मलेल्या अशोक खाडे यांची परिस्थिती सुरुवातीला खुपच गरीबीची होती. त्यांचे वडिल एका झाडाखाली चप्पल शिवण्याचे दुकान लावायचे, तर आई शेतात मजूरी करायचे.

अस्पृश्य म्हणत गावातले लोक त्यांच्या पुर्ण कुटुंबाचा अपमान करायचे, इतकंच नाही तर तहान भागवण्यसाठी त्यांना कधी विहिरीचे पाणी सुद्धा पिऊ नाही दिले. १९७२ मध्ये दुष्काळामध्ये तर एका कुटुंबाने अशोक खाडे यांना दोन वेळच्या जेवणासाठी दत्तक सुद्धा घेतले होते.

अशोक खाडे यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. एकदा अशोक पाचवीमध्ये शिकत असताना त्यांच्या हातातून पिठाचा डबा चिखलात पडला, यावर त्यांची आई खुप रडायला लागली. कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते की ते पुन्हा धान्य विकत आणून ते दळतील, तेव्हाच अशोक यांनी ठरवले की आपण या परिस्थितून बाहेर पडायचे.

११ वी नंतर त्यांना आपल्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले आणि त्यांनी माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. तेव्हा परिस्थिती सुधरत असल्यामुळे त्यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले.

अशोक खाडे यांचे हस्ताक्षर चांगले असल्याने त्यांना शिप डिझाईनिंगची ट्रेनिंग देण्यात आली. चार वर्षानंतर त्यांना पर्मटनंट करण्यात आले. तेव्हा एका कामामुळे ते जर्मनित गेले. तेव्हा तिथे त्यांनी टेक्नॉलॉजी पाहिली. त्यामुळे त्यांनी आपली स्वत:ची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

अशोक खाडे यांनी त्यांच्या दोन भावांसोबत मिळून दास ऑफशोअर कंपनीची स्थापना केली. त्यांना पहिलीच ऑर्डर माझगाव डॉकवरुन मिळाली. १९९३ नंतर त्यांना नवनवीन ऑर्डर मिळत गेल्या. आज त्यांच्या सध्या इंजिनियअरिंग डेअरी, ऍग्रो प्रॉडक्टस, रस्ते बांधणी, उड्डाण पुल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ७ कंपन्या आहे. इतकेच नाहीतर मुंबईतला पहिला स्कायवॉक त्यांनीच बांधला होता.

एकेकाळी अस्पृश्य म्हणत ज्या लोकांनी अशोक खाडेंना धुत्कारले होते, त्यांनीच आता खाडेंच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरल्या होत्या. त्यामुळे अशोख खाडे आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.