साधा वेटर ते ४५० हॉटेलचे मालक, वाचा विठ्ठल कामत यांचा प्रेरणादायी प्रवास

0

विठ्ठल कामत यांचे नाव जगातल्या सगळ्यात यशस्वी हॉटेल व्यवसायिंकामध्ये घेतले जाते. एका साधारण कुटुंबातील मुलगा ते पहिले इकोटेल पंचतारांकित हॉटेल सुरू करणे सोपी गोष्ट नाही.

त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. विठ्ठल कामत यांचा जन्म मुंबईत झाला होता. येथीलच रॉबर्टमनी हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवीही घेतली.

त्यांचे वडिल आधीपासूनच हॉटेल व्यवसायात होते. त्यांचे एक छोटेखानी हॉटेल होते. त्यांच्या आईचे म्हणणे होते की विठ्ठल यांनी वडिलांना हातभार लावावा. पण त्यांच्या वडिलांना कोणीतरी फसवले आणि पुर्ण हॉटेलवर ताबा मिळवला.

मग विठ्ठल यांनी आपल्या वडिलांसोबत काम करण्यास सुरूवात केली. जेव्हा बरेच दिवस त्यांनी हॉटेल व्यवसायात काम केले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांसमोर हा व्यवसाय वाढविण्याचा प्रस्ताव मांडला.

वडिलांनीही त्यांना होकार दिला. व्यवसायवाढीसाठी त्यांनी विदेशात जायचे ठरवले. त्यांनी थेट लंडन गाठले आणि प्रत्येकी आठवडा ७५ पौड एवढ्या पगाराची नोकरी केली. ते एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते.

काम करत असताना त्यांनी हॉटेल व्यवयासातील बारकावे लक्षात घेतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी अनेक हॉटेल्स सुरू केले. त्यांना या व्यवसायातून चांगला फायदा होत होता. एकदा त्यांना समजले की सांताक्रुझ विमानतळाजवळचे हॉटेल प्लाझमा विकायला काढले आहे.

त्यांनी ते हॉटेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याकडे पुरेसे पैसै नव्हते. त्यांनी नंतर पैसै गोळा करून ते हॉटेल विकत घेतले आणि आज त्याच ठिकाणी भारतातील पहिले इकोटेल फाईव्ह स्टार हॉटेल ऑर्किड उभे आहे.

त्यांचे स्वप्न तीस वर्षानंतर पुर्ण झाले होते. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. जगातील अनेक देशांमध्ये त्यांचे हॉटेल्स आहेत. अनेक देशांमध्ये विठ्ठल कामत ही रेस्टॉरंटची फ्रेंचाइजी आहे.

फोर्ट जाधवगड, महोदधी पॅलेस, विट्स बिझनेस हॉटेल्स, लोटस रेस्टॉरंट्स असे अनेक हॉटेल्स त्यांचे आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहीली आहेत. त्यातील एक पुस्तक आहे इडली, ऑर्किड आणि मी. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या यशाची गुरूकिल्ली लिहीली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.