कुरियर बॉयचे काम सोडून सुरू केला पोल्ट्री फार्म; आता महिन्याचे उत्पन्न आहे लाखांमध्ये

0

 

अनेक लोकांचे दुसऱ्याच्या इथे काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न असते. पण ते सत्यात उतरवणे तेवढेच कठीण असते. पण जर मनात जिद्द असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला सिद्ध करता येते. अशीच ही गोष्ट आहे बुलढाण्यातील शिवानंद दोतोंडे यांची.

शिवानंद दोतोंडे बुलढाण्यात एक पोल्ट्री फार्म चालवतात. त्यांना या पोल्ट्री फार्ममधून भरपूर उपन्न मिळते. पण तुम्हाला माहितीये का शिवानंद हे आधी ऍमेझॉन कंपनीत कुरियर बॉयचे काम करायचे.

सुरुवातीला ते कुरियर बॉयचे काम करायचे. त्यात त्यांना महिन्याला १५ हजार रुपये पगार मिळायचा. पण त्यांना ते परवडत नव्हते. सोबतच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. मित्राचे पोल्ट्री फार्म पाहून त्यांनीही पोल्ट्री फार्म व्यवसाय करण्याचे ठरवले.

२०१९ मध्ये शिवानंद यांनी पोल्ट्री फार्म सुरू केला. त्यांच्याकडे सध्या ३ शेडमध्ये ६ हजार इतक्या कोंबड्या आहे. पोल्ट्री फार्म करताना कोंबड्यांची जास्त काळजी घ्यावी लागते, विशेष म्हणजे त्यांच्या खाद्याची.

सकाळी ७ वाजता कोंबड्यांना खाद्य टाकावे लागते. दुपारनंतर पोल्ट्री फार्ममध्ये अंडी गोळा करण्यासाठी जावे लागते. संध्याकाळी पुन्हा एकदा पक्षांना खाऊ घालावे लागते. त्यानंतर तिथे पुन्हा जाण्याची गरज पडत नाही, असे शिवानंद सांगतात.

कोरोनाच्या संकटात शिवानंद यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. अंडी ही रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगली असल्याने बाजारात अंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे कोरोना संकटातही शिवानंद यांना चांगला नफा मिळाला आहे.

६ हजार कोंबड्यांना खाद्य दिल्यानंतर दिवसाला ५ हजार इतकी अंडी निघतात. त्याच्यातून २२ हजार रुपयांचे उपन्न मिळते, त्यात १२ हजार रुपयांचे कोंबड्यांना खाद्य लागते. महिन्याला दीड लाख रुपये शिवानंद यांना या व्यवसायातुन मिळतो, असे शिवानंद म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.